Cheteshwar Pujara (Photo Credit: BCCI)

India Vs Australia 4th Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी (Sydney) येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाअखेर 303 धावांत 4 गडी गमावले आहेत. या सामन्यात चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) दमदार शतक झळकावले. तर मयांक अग्रवालने (Mayank Agarwal) 77 धावांची खेळी करत धावसंख्येला चांगला हातभार लावला. पुजारा 130 धावांवर तर हनुमा विहारी (Hanuma Vihari) 39 धावांवर नाबाद राहिले आहेत.

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. लोकेश राहुल (K. L. Rahul) केवळ 9 धावांत तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी 116 धावांची भागिदारी करत भारताचा डाव सावरला. तर विराट कोहली 23 आणि अजिंक्य राहणे 18 धावा करत बाद झाले.

चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने 2 सामने जिंकले आहेत.