India vs Australia 4th Test: KL Rahul च्या खराब कामगिरीवर सोशल मीडियात टीका, मीम्स व्हायरल
KL Rahul Memes (Photo Credits: Twitter)

India vs Australia 4th Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून ऑस्ट्रेलियाच्या सिडनी (Sydney)  स्टेडियममध्ये सुरूवात झाली आहे. भारत पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरल्यानंतर अवघ्या 9 धावांवर भारताचा सलामीवीर के.एल. राहुल (KL Rahul) बाद झाला. चांगल्या फॉर्ममध्ये नसतानाही त्याचा संघात समावेश झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. चौथ्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी शॉन मार्शकने त्याची विकेट घेतल्याने सोशल मीडियातून त्याच्यावर टीका आणि मिम्स व्हायरल होत आहेत. येथे पहा भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना LIVE  

के. एल राहुलवर टीका

 

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत या चार कसोटी सामन्यांमध्ये भारताकडे 2-1 अशी आघाडी आहे. चौथा कसोटी सामना जिंकत मालिका खिशात घालणं हेच भारतीय संघाचं उद्दिष्ट आहे. सध्या के.एल.राहुलसह मयंक अग्रवाल अर्धशतक झळकवून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.