Live Cricket Streaming and Score India vs Australia 4th Test Match, Day 1: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका चौथा सामना पहिला दिवस - लाईव्ह स्ट्रिमिंग इथे पाहा
टीम इंडिया (Photo: BCCI Twitter)

India vs Australia 4th Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या टेस्ट मालिकेत भारतीय संघाने आघाडी घेतली आहे. या मालिकेत भारत 2-1ने आघाडीवर आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेला शेवटचा सामना सिडनी येथील क्रिकेट मैदानात (Sydney Cricket Ground) खेळला जात आहे. शेवटच्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज इसांत शर्मा (Ishant Sharma) याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्याऐवजी उमेश यादव (Umesh Yadav) याला स्थान देण्यात आले आहे. वेबसाईट 'ईएसपीएन' ने दिलेल्या वृत्तानुसार रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)याचाही समावेश करण्यात आले होते. मात्र, अवघ्या दोन तासानंतरच त्याला अनफिट घोषीत करण्यात आले.

दरम्यान, उमेश यादव याच्याशीवाय गुरुवारी होत असलेल्या चौथ्या अंतिम टेस्ट मॅचमध्ये 13 सदस्यीय भारतीय संघात कुलदीप यादव (Kuldeep Yadav)यालाही स्थान देण्यात आले आहे. तसेच, रोहित शर्मा (Rohit Shrma ) याच्या जागेवर लोकेश राहुल (K. L. Rahul) याला स्थान देण्यात आले आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 5.00 वाजता सुरु होईल. हा सामना आपण Sony Liv पाहू शकता.

आर अश्विनबद्दल बोलताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने म्हटले आहे की, आर अश्विन तंदुरुस्त नाही. ही बाब आमच्यासाठी काहीशी निराशाजनक आहे. त्याचे संघासोबत असणे विद्यमान स्थितीत अत्यंत महत्त्वाचे होते. टेस्ट क्रिकेटमध्येही तो भारतीय संघाचा अविभाज्य घटक राहिला आहे. आम्ही त्याला 100 टक्के तंदुरुस्थ असताना मैदानावर पाहू इच्छितो. (सामन्याचे लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी इथे क्लिक करा)

भारतीय टेस्ट टीम: विराट कोहली ( कर्णधार), लोकेश राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जड़ेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह और उमेश यादव.