India vs Australia 4th Test:  सिडनी टेस्टमध्ये Cheteshwar Pujara चं शतक, ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील कसोटी सामन्यांमधील तिसरं शतक
Cheteshwar Pujara (Photo Credits: Getty)

India vs Australia 4th Test:  भारताचा आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) सिडनी टेस्टमध्ये शतक झळकावलं आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यामधील चेतेश्वर पुजारा याचं हे तिसरं शतक आहे. आज ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत तिसर्‍या कसोटी सामन्याला सिडनीमध्ये (Sydney) सुरूवात झाली. भारतची पहिली विकेट के. एल राहुलची अवघ्या 9 धावांवर गेली. त्यानंतर अर्धशतक झळकवून मयंक अग्रवाल बाद झाला त्यामुळे डळमळीत झालेली भारतीय संघाची धुरा पुढील क्रिकेटपटूंनी सांभाळली. KL Rahul च्या खराब कामगिरीवर सोशल मीडियात टीका, मीम्स व्हायरल

के.एल. राहुल आऊट झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात उतरला. पुजाराने ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोर दमदार फलंदाजी केली. त्याने 12 चौकार मारले. अ‍ॅडलेड, मेलबर्न पाठोपाठ चेतेश्वर पुजाराने सिडनी कसोटी सामन्यांमध्येही शतकी खेळी केली आहे. चेतेश्वरच्या टेस्ट करियरमधील हे त्याच18 वं शतक आहे.  मयंक अग्रवालसोबत चेतेश्वर पुजाराने भारताचा डाव सांभाळला. व्ही.व्ही.एस लक्ष्मणसह क्रिकेट चाहत्यांकडून चेतेश्वर पुजारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी फार कमाल दाखवू शकला नाही. विराट 23 धावांवर आऊट झाला.