IND vs SL मॅचमध्ये टीम इंडियाकडून श्रीलंकेचा 7 विकेट्सनी धुव्वा, गुणतालिकेत मिळवले पहिले स्थान

आयसीसी (ICC) विश्वचषकमधील साखळी सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) श्रीलंका (Sri Lanka) चा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. श्रीलंकाविरुद्ध मॅचमध्ये विजय मिळवत टीम इंडियाने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहेत. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकत फंलदाजीचा निर्णय घेतला आणि भारतासमोर 265 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीजोडी के. एल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharm) यांनी आक्रमक सुरुवात केली आणि 8 ओव्हरमध्येच दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली. तर, 18व्या ओव्हरमध्ये भारताने आपल्या 100 धावा पूर्ण केल्या. (IND vs SL मॅचमध्ये 'हिटमॅन' रोहित शर्मा चे विश्वविक्रमी पाचवे शतक; मोडला सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा यांचा विश्वकप रेकॉर्ड)

दरम्यान, भारतासाठी 'हिटमॅन' रोहितने 94 चेंडूत 103 धावा केल्या. याचबरोबर रोहितने क्रिकेट जगतमधील दिग्गज कुमार संगकारा (Kumar Sangakkara) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचे विश्वचषक रेकॉर्ड मोडले आहे. रोहितने आपल्या या पाचव्या शतकासह एकाच विश्वचषकमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा संगकाराचा विश्वविक्रम मोडला. दुरीकडे, राहुलने 118 चेंडूत 113 धावा केल्या. राहुलचे हे विश्वकपमधील पहिले शतक आहे.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत श्रीलंकाचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. मात्र, अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) च्या एकाकी झुंजीच्या जोरावर श्रीलंकेने टीम इंडियासामोर 265 धावांचे लक्ष्य ठेवले.