
IND W vs ENG W One-Off Test: भारतीय महिला संघ (India Women's Team) सात वर्षाच्या कालावधीनंतर कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सामना ब्रिस्टल (Bristol) मैदानावर इंग्लंड विरुद्ध होईल. टीम इंडिया (Team India) नोव्हेंबर 2014 नंतर पहिली टेस्ट मॅच खेळणार असतानाही ब्रिटनमध्ये क्वारंटाईननंतर सरावासाठी अवघे काहीच दिवस मिळाले. मिताली राज (Mithali Raj), हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) या अनुभवी खेळाडूंनी देखील कसोटी सामना खेळलेला नाही, त्यामुळे युवा खेळाडूंना हे आव्हान अधिक कठीण जाईल. जरी सर्व खेळाडू फॉर्ममध्ये व तंदुरुस्त असले तरी सामन्याच्या सरावासाठी पर्याय नाही. इंग्लंडमध्ये भारताने आठ सामने खेळले असून दोन जिंकले असून एकदाही त्यांना पराभव पत्करावा लागलेला नाही, तर यजमानचा 47 कसोटींचा अनुभव आहे, तर भारताकडे 30 सामने आहेत. आज आपण ब्रिस्टल कसोटी सामन्यात टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरते या बाबत कल्पना घेणार आहोत. (IND-W vs ENG-W Test: इंग्लिश संघावर टीम इंडियाचा दबदबा, 35 वर्षांपासून ब्रिटिश टीम मायदेशात पराभूत; तर मिताली राजच्या भारताला विक्रमी चौकाराची संधी)
महिला संघाला पुरुष संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्याकडूनही उपयुक्त सल्ला मिळाला आहे जो इंग्लंडमध्ये संघाच्या कामी येऊ शकतो. या सामन्यात मंधानाबरोबर 17 वर्षांची शेफाली वर्मा सलामीला येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. अनुभवी मिताली, हरमनप्रीत आणि पूनम राऊत यांच्यावर मधल्या फळीत धावा काढण्याची जबाबदार असेल. दिलासा देणारी बाब म्हणजे इंग्लंडने ड्यूकऐवजी कुकाबुररा बॉलची निवड केली आहे. तानिया भाटिया संघाची विकेटकीपर असेल. विकेटकिपिंगच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या भाटियालाही विकेटच्या पुढे स्वत:ला सिद्ध करायचे आहे. इंग्लंड महिलांविरुद्ध सामन्यासाठी भारत महिला संघातील एकमेव अष्टपैलू अष्टपैलू दीप्ती शर्मा 6व्या किंवा 7व्या क्रमांकाच्या प्लेइंग इलेव्हन संतुलित करेल. 2014 मध्ये पदार्पण केल्यापासून ऑफस्पिनिंग अष्टपैलू खेळाडू सातत्याने कामगिरी करत आहे.
शिखा पांडे आणि झुलन गोस्वामी यांची अनुभवी जोडी वगळता भारतीय महिलांकडे गोलंदाजीचे पर्याय आहेत. 2014 गोस्वामीने मागील कसोटी सामना देखील खेळला असून तिने आजवर एकूण 10 रेड-बॉल मॅच खेळले आहेत. पांडेने दोन कसोटी सामन्यांत केवळ चार विकेट्स घेतल्या आहेत पण तिने झुलनला चांगली साथ दिली आहे. तिसर्या वेगवान गोलंदाजाची भूमिका पूजा वस्त्राकरकडे जाऊ शकते. अरुंधती रेड्डी आणखी एक पर्याय आहे. भारतीय महिलांनी निवडण्यासाठी अनेक फिरकी गोलंदाज आहेत. केंद्रीय करारातून वगळलेली एकता बिष्ट इंग्लंड विरोधात फिरकी गोलंदाजीची नेतृत्व करू शकते. राधा यादव आणि स्नेह राणा हे इतर पर्याय आहेत, पण बिष्टला कदाचित सर्वात उत्तम पर्याय ठरु शकते.
भारत महिला संभाव्य प्लेइंग इलेव्हन: मिताली राज (कॅप्टन), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, पुनम राऊत, हरमनप्रीत कौर, तानिया भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, शिखा पांडे, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, एकता बिष्ट.