भारत महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ESPNcricinfo)

IND-W vs ENG-W Test: मिताली राजची (Mithali Raj) टीम इंडिया (Team India) 16 जूनपासून पुन्हा एकदा व्हाईट जर्सी परिधान करत कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. ब्रिस्टलमधील (Bristol) काउंटी मैदानावर एकमेव कसोटी सामन्यातून भारतीय संघ (Indian Team) इंग्लंड दौऱ्याची (England Tour) सुरुवात करेल. कसोटीबद्दल बरीच उत्सुकता लागून आहे कारण भारतीय संघातील बर्‍याच खेळाडूंना या फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध करायचे आहे. दुसरीकडे, इंग्लंडच्या महिला संघाला घरगुती परिस्थितीचा फायदा होईल. टीम इंडियाने अखेर नोव्हेंबर 2014 मध्ये अखेर कसोटी सामना खेळला होता. 2014 मध्ये भारत एकमेवा कसोटी सामन्यासाठी इंग्लंड दौर्‍यावर आला होता आणि त्याचवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी सामना खेळला होता. (IND-W vs ENG-W Test: इंग्लंडमध्ये महिला संघाला टीम इंडियाच्या चॅम्पियन फलंदाजाची साथ, पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी दिल्या मौल्यवान बॅटिंग टिप्स)

भारतीय महिला संघ जवळपास सात वर्षांनंतर कसोटी सामने खेळत आहे. मात्र, यंदा इंग्लंडनंतर संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील कसोटी सामना खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड संघाने कसोटी क्रिकेट इतिहासात आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामने भारताने जिंकले तर इंग्लंडने एक विजय नोंदविला. उर्वरित 10 खेळ अनिर्णित राहिले. मात्र एक रेकॉर्ड आहे जो मितालीच्या संघाबरोबर आहे तो म्हणजे इंग्लंडमध्ये अपराजित राहण्याचा. भारतीय संघाने इंग्लंडमध्ये 8 टेस्ट सामने खेळले असून त्यापैकी 2 सामन्यात संघ अजेय राहिला आहे तर 6 अनिर्णित राहिले आहेत. म्हणजे इंग्लिश संघ भारताविरुद्ध मायदेशात अद्याप एकही विजय मिळवू शकलेला नाही आहे. त्यामुळे टीम इंडिया ब्रिटिश देशात विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी उत्सुक असेल. इंग्लंडने 1995 मध्ये भारतात एकमेव कसोटी सामना जिंकला होता. भारतीय महिला संघाने 1976 मध्ये प्रथमच कसोटी सामना खेळला होता.

शिवाय, सर्वकाही सुरळीत राहिल्यास महिला कसोटींमध्ये सलग सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम मोडण्याची टीम इंडियाकडे सुवर्ण संधी आहे. त्यांनी शेवटचे तीन, इंग्लंड विरुद्ध दोन आणि भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक सामना जिंकला आहे. म्हणजेच एक विजय भारताला ऑस्ट्रेलियन संघाच्या पुढे नेऊन उभे करेल. अशास्थितीत एकमेव कसोटी सामन्यात कोणता संघ बाजी मारेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.