IND-W vs ENG-W Test: इंग्लंडमध्ये महिला संघाला टीम इंडियाच्या चॅम्पियन फलंदाजाची साथ, पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी दिल्या मौल्यवान बॅटिंग टिप्स
भारत महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/BCCI Women)

IND-W vs ENG-W Test: भारतीय महिला संघ (Indian Women's Team) इंग्लंडविरुद्ध (England) 16 जूनपासून एक कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे आणि त्यासाठी भारतीय पुरुष संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) आपले अनुभव महिला संघासह सामायिक केले आहेत. महिला संघ 7 वर्षांनंतर कसोटी सामना खेळण्यास मैदानावर उतरणार आहे. ब्रिस्टलच्या (Bristol) काऊंटी मैदानावर हा ऐतिहासिक सामना रंगणार आहे. कर्णधार मिताली राजच्या (Mithali Raj) संघाने दोन इंग्लंड विरुद्ध आणि एक दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध अशा शेवटच्या तीन कसोटी जिंकल्या आहेत. पण त्यातील दोन सामने त्यांनी नोव्हेंबर 2014 मध्ये खेळल्या होत्या. अशास्थितीत सात वर्षात पहिल्या रेड बॉल सामन्याआधी, भारताची उपकर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांनी महिलांच्या संघातील आव्हानांविषयी सांगितले ज्यांना खेळाच्या दीर्घ स्वरुपात अनुभव नाही आहे आणि अजिंक्य रहाणेशी झालेल्या चर्चा त्यांना आव्हान पेलण्यास कशी मदत करतात याबाबत खुलासा केला. (India Tour of England 2021: इंग्लंड दौऱ्यावर एक टेस्ट सामना आणि या 10 महिला खेळाडूंना डेब्यूची संधी, ‘ही’ युवा फलंदाज करणार इंग्रजांची धुलाई)

“मी रेड बॉल क्रिकेट जास्त खेळलेले नाही, मी फक्त दोन कसोटी सामने खेळले आहेत. यावेळी आम्हाला अजिंक्य रहाणे यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली, आम्ही दीर्घ स्वरुपात कशी फलंदाजी करावी याबद्दल आम्ही मानसिकदृष्ट्या आपण सज्ज आहोत. नेट्समध्येही आम्ही मनाच्या योग्य चौकटीत राहण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही खुश असता तेव्हा तुम्ही चांगले क्रिकेट खेळता. आम्ही आमच्या सामर्थ्यानुसार खेळायचा प्रयत्न करतो. रहाणेशी आमची सोपी आणि मैत्रीपूर्ण चर्चा झाली. ते खूप अनुभवी आहेत, त्यांच्याशी बोलण्याची संधी आम्हाला मिळाली आणि आम्ही ते तंतोतंत केले,” आभासी पत्रकार परिषदेत हरमनप्रीत म्हणाली. झुलन गोस्वामीमुळे कसोटी सामन्यात होणाऱ्या संभाव्य परिणामाबद्दल विचारले असता हरमनप्रीत म्हणाली: झुलन नेहमीच पुढाकार घेणारी असते, ती आमच्यासाठी नेहमीच खास असते. जेव्हा आम्हाला त्यांची आवश्यकता असेल तेव्हा ती नेहमी आम्हाला यश मिळवून देते. कसोटीमध्ये आपणास ब्रेकथ्रूची आवश्यकता असते आणि आपणास विकेट्स घेण्याची गरज असते. मला वाटते की या कसोटी सामन्यातही ती शानदार असेल.”

भारतीय महिला संघ सोमवारी ब्रिस्टल येथे पोहोचला जिथे ते 10 दिवस क्वारंटाईन होते. दरम्यान, हरमनप्रीतने भारताकडून दोन कसोटी, 104 वनडे आणि 114 टी-20 सामने खेळले आहेत. इंग्लंडमधील खेळपट्टबाबत हरमनप्रीत कौर म्हणाली, “इंग्लंडमधील खेळपट्टी खूप वेगळी आहे. येथे बॉल स्विंग होतो आणि आम्हाला त्याचा नेट्समध्ये अभ्यास करायला पाहिजे. आम्हाला सराव करण्यासाठी फक्त काही दिवस मिळाले आहेत.”