प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

वेस्टइंडीज विरुद्धच्या (IND vs WI) सामन्यापूर्वी भरतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट संघातील जवळपास आठ खेळाडूंना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस (COVID-19) संसर्ग झालेल्या खेळाडूंपैकी आतापर्यंत केवळ तिघांचीच नावे समोर आली आहेत. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) , श्रेयस अय्यर (Shreyas Iyer,) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) अशी या तीन खेळाडूंची नावे आहेत. भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात येत्या 6 फेब्रुवारीला एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ वेस्टइंडिज संघासोबत 3 एकदिवसीय सामने आणि 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळेल.

नियोजीत सामने खेळण्यासाठी दोन्ही देशांचे संघ सज्ज झाले आहेत. मात्र, भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू पॉझिटीव्ह आल्यामुळे ही मालिका वेळेवर होईल किंवा नाही याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे समजते. बीसीसीआय यावर लवकरच नवा निर्णय घेण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, IND vs AUS, U19 World Cup 2022 Live Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर-19 विश्वचषक सेमीफायनल सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पाहणार?)

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) , श्रेयस अय्यर (Shreyas Iyer,) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) या तीनही खेळाडूंना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. इतर खेळाडूंच्या नावांची अद्याप पुष्टी होऊ शकली नाही. दरम्यान, बिगर कोचींग प्रसासकीय सहायक कर्मचाऱ्यांमध्येही काहींना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या लोकांची संख्याही दोन ते चार दरम्यान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वेस्टइंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ

एकदिवसीय सामना संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड़, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

टी20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.