ICC U19 World Cup 2022: आयसीसी अंडर-19 विश्वचषकच्या (U19 World Cup) दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात आज भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) आमनेसामने येणार आहेत. पहिला सेमीफायनल सामना इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघात ज्यामध्ये ब्रिटिश संघाने 15 धावांनी विजय मिळवून 24 वर्षानंतर अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. यंगिस्तानबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय संघाला (Indian Team) गेल्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध पराभूत होऊन उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. तर त्यापूर्वी संघाने स्पर्धेचे चार विजेतेपदं काबीज केली आहे. भारत पुन्हा एकदा या स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे तर दुसरीकडे, दोन वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघ विजेतेपदाच्या आणखी जवळ जाण्याच्या निर्धारित असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर-19 विश्वचषक सेमीफायनल सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट आणि ऑनलाईन स्ट्रीमिंगची माहिती खालीलप्रमाणे आहे. (IND vs AUS, U-19 World Cup Semifinal: ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक सामन्यात टीम इंडियाचे ‘या’ पैलूवर असेल फोकस, कर्णधार यश धुलने केला खुलासा)
भारत U19 विरुद्ध ऑस्ट्रेलिया U19 सामना अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर होणार आहे. हा सामना बुधवार, 2 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होईल. भारतीय क्रिकेटचे चाहते भारत U19 विरुद्ध ऑस्ट्रेलिया U19 सामना स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2 आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट HD 2 वर सामन्याचे थेट प्रसारण पाहू शकतात. तसेच भारत U19 विरुद्ध ऑस्ट्रेलिया U19 सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर 19 Squad:
भारत अंडर 19 संघ: यश धुल (कॅप्टन), अंगक्रिश रघुवंशी, हरनूर सिंह, शेख रशीद, सिद्धार्थ यादव, राज बावा, कौशल तांबे, दिनेश बाना (विकेटकीपर), राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल, रवी कुमार, मानव पारख, निशांत सिंधू, अनिश्वर गौतम, आराध्या यादव, गर्व सांगवान.
ऑस्ट्रेलिया अंडर 19 संघ: कूपर कोनोली (कॅप्टन), कॅम्पबेल केलवे, टीग वायली, कोरी मिलर, लचलान शॉ, एडन काहिल, विल्यम साल्झमन, टोबियास स्नेल (विकेटकीपर), टॉम व्हिटनी, जॅक सिनफिल्ड, जॅक निस्बेट, हरकिरत बाजवा, जोशुआ गार्नर, आयझॅक हिगिन्स, निवेतन राधाकृष्णन.