IND vs AUS, U19 World Cup 2022: अफगाणिस्तान संघावर अवघ्या 15 धावांनी विजय मिळवून इंग्लंडने (England) अंडर-19 विश्वचषक फायनलचे तिकीट मिळवले आहे. आता आज चार वेळा अंडर-19 वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया (Team India) अंतिम सामन्यात प्रवेश करण्याच्या उद्देशाने सुपर लीग सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाशी (Australia) भिडेल. दोन्ही संघ या स्पर्धेत सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे त्यामुळे आज होणार हा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी नक्कीच रोमांचक ठरेल. या मनोरंजक सामन्यापूर्वी भारताचा अंडर 19 कर्णधार यश धुलने तीन वेळा विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्लॉकबस्टर सेमीफायनलमध्ये त्यांचा संघ ‘फोकस’ करेल अशा प्रमुख क्षेत्रावर प्रकाश टाकला. उपांत्य फेरीपूर्वी सामनापूर्व पत्रकार परिषदेत बोलताना, यश धुलने (Yash Dhull) ऑसी गोलंदाजी लाइन अप सामान्य मानली, तर त्याने असेही सांगितले की भारतीय कोल्ट्स ‘भागीदारी वाढवण्यावर’ लक्ष केंद्रित करतील. (AFG vs ENG, U19 World Cup 2022: इंग्लंडचा 24 वर्षानंतर फायनलमध्ये, अफगाणिस्तानला एक चूक पडली महागात; भारत किंवा ऑस्ट्रेलियाशी होईल अंतिम लढत)
“ऑस्ट्रेलियन गोलंदाजी आक्रमण हे सामान्य आहे आणि आम्ही झटपट विकेट गमावल्याबरोबर भागीदारी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतो,” भारताने एकापाठोपाठ विकेट गमावल्याबद्दल विचारले जात असताना धुल म्हणाला. तो पुढे म्हणाला, “आमचे लक्ष नंतर भागीदारी बनवण्याकडे वळते जेणेकरून आम्ही डेथ ओव्हर्समध्ये अधिक धावा करू शकू.” याशिवाय धुलने माजी भारतीय दिग्गज व्हीव्हीएस लक्ष्मण यांचेही कौतुक केले जे भारतीय संघासोबत आहेत आणि त्यांना कोविडसारख्या अडथळ्यांना तोंड देण्यासाठी मदत केली. स्पर्धेच्या सुरुवातीलाच कर्णधार यश धुलसह भारतीय ताफ्यातील खेळाडूंना कोविड-19 ची सकारात्मक लागण झाली. बीसीसीआयने त्वरित कारवाई केली आणि भारत U19 साठी राखीव खेळाडूंना बॅकअप म्हणून पाठवले.
या घटनेनंतर युवा खेळाडूंनी युगांडा आणि आयर्लंडसारख्या संघांविरुद्ध चमकदार कामगिरी केली आणि सुपर लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या बांगलादेशचाही पराभव केला. संघ आता पूर्ण ताकदीनिशी परतला आहे आणि अभूतपूर्व पाचव्या अंडर-19 विश्वचषक विजयाच्या वाटचाल सुरु ठेवण्यासाठी आता त्यांच्या मार्गात लयीत असलेल्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. भारत अंडर-19 आणि ऑस्ट्रेलिया अंडर-19 यांच्यातील हायव्होल्टेज सामना अँटिग्वाच्या कूलिज क्रिकेट ग्राउंड येथे खेळला जाणार आहे.