टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात टॉस जिंकून विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर (Jason Holder) याने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. आजच्या निर्णायक मॅचसाठी विंडीज संघात दोन बदल करण्यात आले आहेत. तर भारतीय संघात युझवेन्द्र चहल (Yuzvendra Chahal) याला स्थान मिळाले आहेत. आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला विश्रांती देण्यात आली आहेत. भारताने विंडीजविरुद्ध टी-20 मालिका 3-0 ने जिंकली. त्यानंतर तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आजचा सामना हा पोर्ट ऑफ स्पेनमध्ये होणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात विजय मिळवून भारताचे मालिका विजयाचे लक्ष्य असेल. (IND vs WI 3rd ODI Weather Forecast: पावसामुळे भारत-विंडीज मॅचवर पावसाचे संकट, जाणून घ्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये कसे असेल हवामान)
दुसरीकडे, विंडीजसाठी वनडे मालिका वाचवण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. शिवाय, त्यांचा तडाखेबाज फलंदाज क्रिस गेल याचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. त्यामुळे विंडीज संघ गेलला विजयी निरोप देण्याच्या निर्धराने मैदानात उतरेल. भारतासाठी सलामीवीर शिखर धवन याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. त्याशिवाय मधल्या फळीत चौथ्या क्रमांकाची डोकेदुखी अद्याप कायम आहे. रिषभ पंत याला अद्याप या क्रमांकावर समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. श्रेयस अय्यर याने मात्र पाचव्या क्रमांकावर अर्धशतक करून मधल्या फळीत आपली दावेदारी पक्की करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे.
असा आहे भारत आणि वेस्ट इंडिज संघ:
टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, युझवेन्द्र चहल, केदार जाधव, भुवनेश्वर कुमार आणि नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज: क्रिस गेल, एव्हीन लुईस, शे होप, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, रोस्टोन चेस, जेसन होल्डर (कॅप्टन), कार्लोस ब्रेथवेट, फॅबियन अॅलन, किमो पॉल, आणि केमार रोच.