IND vs WI 3rd ODI Weather Forecast: पावसामुळे भारत-विंडीज मॅचवर पावसाचे संकट, जाणून घ्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये कसे असेल हवामान
(Photo Credit: @ICC/Twitter)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अंतिम सामन्यामध्ये आमने-सामने असतील. याआधी पहिली वनडे पावसामुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या मॅचमध्ये दमदार प्रदर्शन करत सामना जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून घेतली. दुसऱ्या वनडेमध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांच्या खेळीच्या जोरावर विजय मिळवला. पहिल्या सामान्याप्रमाणे दुसऱ्या वनडेमध्ये देखील पावसाने अनेकदा व्यत्यय आणला. पण, यासर्वांना न जुमानता दोन्ही संघाने चांगले प्रदर्शन केले. वेस्ट इंडिजसाठी एव्हिन लुईस आणि निकोलस पुरन यांनी दमदार खेळ करत सामन्यात रंगत आणली. पण, यजमानांना विजय मिळवून देण्यास अपयशी ठरले. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये (Port of Spain) खेळण्यात आलेल्या मागील 10 सामन्यात भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहेत. (IND vs WI 2019: वासिम जाफर याने विराट कोहली याच्यावर केली मोठी भविष्यवाणी, म्हणाला वनडेमध्ये करणार इतकी शतकं)

आता दोन्ही संघ पुन्हा एकदा पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर तिसरा वनडे सामना खेळण्यास सज्ज आहे. पण, मागील सामन्याप्रमाणेच तिसऱ्या वनडे मॅचमध्ये देखील पावसाचे संकट कायम आहे. विंडीजमध्ये हवामान खात्याच्या अंदाजानुसार पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दिवसभर विखुरलेल्या वादळी वादळासह अंदाजे 40% पावसाची शक्यता आहे. पण सामना लवकर सुरू होण्याच्या कारणाने याचा मॅचवर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, क्वीन्स पार्क ओव्हलच्या खेळपट्टीवर बॉल छान फलंदाजीच्या बॅटवर येतो त्यामुळे तिसऱ्या वनडेमध्ये फलंदाजांना मोठी धावा संख्या करण्यास सहकार्य होईल. टीम इंडिया आणि विंडीजमधील निर्णायक मॅचसाठी भारतीय संघात एक बदल होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. जलद गोलंदाज खालील अहमद याच्याऐवजी नवदीप सैनी याला संधी मिळण्याची शक्यता आहे.