IND vs SL T20I 2020: श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी ऑनलाईन तिकिटं विक्रीसाठी उपलब्ध, जाणून घ्या किंमती
(Photo Credit: IANS)

नवीन वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडिया (India) श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. 5 जानेवारीपासून दोन्ही संघातील 3 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. 7 जानेवारी रोजी इंदोरच्या (Indore) होळकर स्टेडियम (Holkar Stadium) मध्ये होणार्‍या टी-20 सामन्यासाठी 25 डिसेंबरपासून सामान्य श्रेणीची तिकिटं उपलब्ध असतील. सर्वसाधारण श्रेणीतील सर्वात स्वस्त तिकिट 500 रुपयांचे असेल आणि सर्वात महाग तिकिट 4920 रुपये असेल. या श्रेणीची सर्व तिकिटे ऑनलाइन खरेदी करण्यात सक्षम असतील, तर काउंटरद्वारे दिव्यांग श्रेणीच्या तिकिटांची विक्री केली जाईल. दोन्ही देशांच्या टी -20 मालिकेच्या या दुसर्‍या सामन्यासाठी स्वस्त तिकिटासाठी दर्शकांना सर्वात रुपये खर्च करावे लागतील. इंदोर स्टेडियममध्ये सुमारे 27,000 प्रेक्षकांची क्षमता आहे. आज सकाळी 6 वाजता तिकिटांची ऑनलाईन विक्री सुरू झाली आहे. (श्रीलंका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी शिखर धवन, जसप्रीत बुमराह टीम इंडियात सामिल; रोहित शर्मा, मोहम्मद शमी यांना टी-20 साठी विश्रांती)

वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेतील विजयासाठी मेहनत केल्यावर 2020 वर्ष टीम इंडियाला दौर्‍यावर येणाऱ्या श्रीलंकेच्या टीमचा सामना करावा लागेल. गुवाहाटीतील बरसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल. तिसरा आणि अंतिम टी-20 10 जानेवारी (शुक्रवार) रोजी पुण्यात खेळवण्यात येईल. गुवाहाटी (Guwahati) मध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठीही तिकिटांची विक्री सुरु झाली आहे. पहिल्या टी-20 मॅचसाठी 300 रुपयांचे स्वस्त तिकीट असून महाग तिकीटाची किंमत 5000 रुपये आहे. दुसरीकडे, पुण्यामधील (Pune) मॅचचे तिकिटांची सुरुवाती किंमत 800 ते 3500 रुपयांपर्यंत आहे. स्टेडियममध्ये जाऊन मॅच बघू इच्छूक असलेले चाहते BookMyShow वर जाऊन तिकिटं खरेदी करू शकतात.

श्रीलंकाविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. मोहम्मद शमी याच्यासह मालिकेसाठी उपकर्णधार रोहित शर्मा याला विश्रांती देण्यात आली आहे. पण, दोघांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत पुनरागमन करतील. दुखापतीमुळे वेस्ट इंडिज मालिकेला मुकणाऱ्या शिखर धवन येईन टी-20 आणि वनडे संघात पुनरागमन केले आहे. रोहितच्या अनुपस्थितीत धवन केएल राहुल सह डावाची सुरुवात करेल. श्रीलंका मालिकेनंतर भारत 14 ते 19 जानेवारी दरम्यान तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषविणार आहे.