श्रीलंका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी शिखर धवन, जसप्रीत बुमराह टीम इंडियात सामिल; रोहित शर्मा, मोहम्मद शमी यांना टी-20 साठी विश्रांती
रोहित शर्मा (Photo Credits: Getty Images)

श्रीलंका (Sri Lanka) पुढील वर्षी होणाऱ्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांना विश्रांती देण्यात अली आहे, पण ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी संघात सामिल करण्यात आले आहे. बीसीसीआयने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-20 आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर केली आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) यांना सामिल करण्यात आले आहे. श्रीलंकाविरुद्ध टी -20 मालिकेव्यतिरिक्त धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतही स्थान मिळाले आहे. 5 जानेवारी ते 10 जानेवारी यादरम्यान श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी -20 मालिकेनंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी बुमराहला शमीच्या जागी तीन सामन्यांची टी-20 आणि नंतर वनडे मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले आहे. बुमराहला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेदरम्यान दुखापत झाल्याने त्याला बांग्लादेश आणि नंतर वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेला मुकावे लागले होते.

विशाखापट्टणम येथे वेस्ट इंडिजविरुद्ध दुसर्‍या वनडे सामन्यापूर्वी त्याने टीम इंडियासाठी नेट्समध्ये गोलंदाजी केली होती. दुसरीकडे, धवनला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती, त्यामुळे त्याच्या गुडघ्यावर 25 टाके लागले. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी येथे पाच सदस्यीय समितीच्या बैठकीनंतर संघाची घोषणा केली. युवा खेळाडू-नवदीप सैनी, शिवम दुबे आणि शार्दूल ठाकूर यांनीही संघात आपले स्थान कायम ठेवले आहे. दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार यांना वगळण्यात आले आहे. भुवि आणि चाहरला दुखापत झाली असल्याने त्यांना वगळण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत एकदिवसीय संघ: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, आणि मोहम्मद शमी.

श्रीलंकेविरुद्ध भारताची टी-20 संघः विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसण, रिषभ पंत, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर.