भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) पुन्हा एकदा यंदाच्या दौऱ्यादरम्यान आमने-सामने येणास सज्ज होत आहे. टी-20 मालिका 1-1 ने ड्रॉ झाल्यावर दोन्ही संघ आता 3 सामन्यांच्या टेस्ट मालिकेत दोन हात करतील. दोन्ही संघातील पहिली टेस्ट 2 ऑक्टोबरपासून विशाखापट्टणम इथे खेळली जाईल. विश्वचषकच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर टीम इंडियाने दणक्यात पुनरागमन केले. वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट मालिकेत संघाने सुरुवातीपासून वर्चस्व राखले आणि क्लीन-स्वीप मिळवला. विंडीजविरुद्ध मालिकेत विजय मिळवत टीम इंडियाने टेस्ट चॅम्पियनशिपची दमदार सुरुवात केली आणि गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले. आणि आता टेस्ट चॅम्पियनशिपमधील विजयी मोहीम सुरु ठेवण्याच्या उद्देशाने टीम इंडिया आफ्रिकाविरुद्ध टेस्ट मालिका खेळेल. (IND vs SA 2019 Test: पहिल्या टेस्टमधून रिषभ पंत वर टीम इंडियाच्या Playing XI मधून बाहेर पडण्याची नामुष्की)
मात्र, या मालिकेत एक पराभव टीम इंडियाला महागात पडू शकतो. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एक पराभव आणि भारताच टेस्ट रँकिंगमधील पहिले स्थान धोक्यात पडू शकते. टीम इंडिया सध्या टेस्ट रँकिंगमध्ये 115 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर आफ्रिका संघ 108 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 0–3, 0–2, 0-1 अशी गमावली तर कसोटी क्रमवारीत त्यांची दुसऱ्या स्थानावर घसरण होऊ शकते. दुसरीकडे, जर दक्षिण आफ्रिकाने मालिका 1-0 ने जिंकली तर भारत आणि दक्षिण आफ्रिकाचे 112-112 असे समान गुण होतील. पण, आफ्रिका संघ पहिल्या स्थानांवर पोहचेल, कारण त्यांनी कमी मॅचमध्ये हे गुण अर्जित करतील. आणि आफ्रिकेने सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली असली तरीही दोन्ही संघांचे समान गुण होतील आणि भारत दुसर्या क्रमांकावर जाईल. शिवाय, जर मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली तर भारत 114 गुणांसह अव्वल स्थानावर राहील आणि दक्षिण आफ्रिका 109 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहील.
दरम्यान, टी-20 मालिकेत पहिला मॅचमध्ये पराभवाला सामोरे गेल्यावर दक्षिण आफ्रिकाने दमदार पुनरागमन केले आणि मालिका 1-1 ने ड्रॉ केली. त्यामुळे, आफ्रिका संघ चांगल्या लयीत दिसत आहे. पण, टीम इंडियाला घरच्या मैदानावर आव्हान देणे कठीण असेल. मागील दौऱ्यावरही आफ्रिका संघाला भारताकडून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते.