IND vs SA 2019 Test: पहिल्या टेस्टमधून रिषभ पंत वर टीम इंडियाच्या Playing XI मधून बाहेर पडण्याची नामुष्की, ऋद्धीमान सहा ला मिळणार संधी
ऋद्धीमान सहा, रिषभ पंत (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील कसोटी मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरू होईल. पहिला सामना विशाखापट्टणममध्ये खेळला जाईल. या मालिकेत भारतीय संघासमोर सर्वात मोठा प्रश्न विकेटकीपरविषयी आहे. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) ने अद्याप एकही सामना खेळलेला नाही, तर रिषभ पंत (Rishabh Pant) ची आजवर केलेली कामगिरी काही खास नाही. 21 वर्षीय पंतने दक्षिण आफ्रिकाविरूद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत 4 आणि 19 धावा केल्या. आणि याच नुकसान त्याला आफ्रिकाविरुद्ध आगामी पहिल्या कसोटीत बसून शकतो. एमएस धोनी (MS Dhoni) नंतर टीम इंडियात पंतला विकेटकीपिंगसाठी पहिली पसंत म्हटले जात होते, पण त्याला मिळालेल्या संधीचा सदुपयोग करता आला नाही. (IND vs SA 2019 Test Series: 'हे' 5 दक्षिण आफ्रिका खेळाडू ठरू शकतात टीम इंडियासाठी घातक)

विश्वचषकपासूनपंत टीम इंडियासह सर्व सामने खेळला आहे. विश्वचषकात त्याला जखमी शिखर धवन याच्या जागी संधी मिळाली होती. तेथे त्याने अनेक डावांमध्ये चांगली सुरुवात केली, पण त्याला एकाही अर्धशतक झळकावता आले नाही. विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज दौर्‍यावर त्याची कामगिरी काही खास नव्हती. त्यामुळे, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी मालिकेत कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) साहाला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याच्या बाजूने आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तनुसार शास्त्री आणि विराटने आगामी कसोटी सामन्यासाठी साहाला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी देण्याबाबतचे मत प्रदर्शित केले आहेत. बातमीनुसार निवड समितीला पंतला विशाखापट्टणम येथे होणाऱ्या पहिल्या मॅचमध्ये शेवटची संधी द्यायची आहे परंतु शास्त्री आणि कोहली साहाला प्राधान्य देण्याच्या विचारात आहेत.

हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे की, मर्यादित ओव्हरपेक्षा कसोटीत पंत अधिक यशस्वी झाला आहे. पंतने आतापर्यंत खेळलेल्या 11 कसोटी मॅचमध्ये 44.35 च्या सरासरीने 754 धावा केल्या आहेत. यामध्ये परदेशी भूमीवरील दोन शतकांचाही समावेश आहे. पण, नुकत्याच संपुष्टात आलेल्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेत तो अपयशी ठरला आहे. अशा परिस्थिती संघ व्यस्थापन सध्याच्या फॉर्मला जास्त महत्व देत आहे.