दक्षिण आफ्रिका संघ (Photo Credit: AP/PTI)

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिका 1-1 ने ड्रॉ झाली. यानंतर, भारतीय संघ आता टेस्ट क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व राखण्यासाठी सज्ज होत आहे. पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला होता, पण दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाने आपले वर्चस्व राखत दमदार विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या आणि अंतिम मॅचमध्ये भारताला आपली विजयी घोडदौड सुरु ठेवता आली नाही आणि खराब फलंदाजीमुळे पराभव सहन करावा लागला. परिणामी दक्षिण आफ्रिकाने विजय मिळवत मालिका ड्रॉ केली. अंतिम मॅचमध्ये भारतीय फलंदाजांनी आफ्रिकी गोलंदाजांसमोर अक्षरशः लोटांगण घातले. आघाडीचे तिन्ही फलंदाज- रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली यांनी निराश केले. यानंतर, आता सर्वांचे लक्ष असेल ते 2 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या 3 मॅचच्या टेस्ट मालिकेवर. (IND vs SA Test Series 2019: दुखापतीने टीम इंडियातून बाहेर झालेल्या जसप्रीत बुमराह ने केले 'हे' Tweet)

वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट मालिकेत भारताने निर्विवाद वर्चस्व राखले. त्यामुळे यंदा आफ्रिका संघाविरुद्ध टीम इंडियाकडून मोठया अपेक्षा आहे. पण, आगामी टेस्ट मालिकेसाठी आफ्रिकी संघात असे काही खेळाडू जे बॅट आणि बॉलने भारतीय फलंदाजांची घातक ठरू शकतात.

फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis)

फाफ डु प्लेसिस (Photo Credit: Getty)

संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसीकडे मालिकेत संपूर्ण फलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल. टी -20 मालिकेत कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर त्याची टेस्ट कर्णधार म्हणून निवड झाली आहे. ड्यू प्लेसीने भारताविरुद्ध 9 कसोटी सामने खेळले असून यामध्ये त्याने आतापर्यंत 27.50 च्या सरासरीने 440 धावा केल्या आहेत. संघाच्या विश्वचषकमधील निराशाजनक कामगिरीनंतर खेळाडू आपला स्तर उंचावण्याच्या प्रयत्नात असतील. शिवाय, ड्यू प्लेसीदेखील संघाला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात असेल.

क्विंटन डी कॉक (Quinton de Kock)

क्विंटन डी कॉक (Photo Credit: Getty)

आफ्रिका टी-20 संघाचा नवीन कर्णधार डी कॉकने मागील दोन्ही मॅचमध्ये प्रभावी खेळी केली. संघाचा सलामीवीर म्हणूनडी कॉकवर मोठा स्कोर करून टीमला चांगली सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी असेल. भारतविरुद्ध खेळलेल्या मागील मालिकेत डी कॉकला 3 मॅचमध्ये फक्त 71 धावा करता आल्या. डी कॉक या मालिकेत दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करू शकतो. टी-20 नंतर कसोटींमध्येही त्याची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी तो आतुर असेल. या मालिकेत चांगली कामगिरी करण्याची डी कॉककडे सुवर्णसंधी असेल.

एडिन मार्करम (Aiden Markram)

एडिन मार्करम (Photo Credit: Getty)

भारत ए संघाविरुद्ध झालेल्या अनधिकृत टेस्ट मालिकेत मार्करमने टेस्ट मालिकेपूर्वी शानदार 161 धावा केल्या आणि संघाच्या अंतिम अनधिकृत टेस्ट सामना जिंकण्यात मोठे योगदान दिले.मार्करमचा भारतविरुद्ध 3 टेस्ट मॅचमध्ये 140 धावा केल्या आहेत. आफ्रिकेच्या मधल्या फळीसाठी मार्करम महत्वाचे योग्यदान देऊ शकतो आणि संघाला मुश्किल परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मोठी करण्यास तो सज्ज आहे.

लुंगी एनगीडी (Lungi Ngidi)

लुंगी एनगीडी (Photo Credit: Getty)

आफ्रिकी संघ सध्या देल स्टेन च्या दुखापतीतून सावरत आहे. अशा परिस्थितीत, कागिसो रबाडा आणि एनगीडी वर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी वाढते. मागील वर्षी भारताच्या आफ्रिका दौऱ्यादरम्यान 29 वर्षीय एनगीडी भारतीय फलंदाजांच्या नाकी-नऊ आणले होते. सेंच्युरियनमध्ये पदार्पणाच्या मॅचदरम्यान एनगीडीने दुसर्‍या कसोटीत भारतीय संघाची 6 बाद 39 धावा अशी अवस्था केली होती. त्याच्या या स्पेलमध्ये विराट कोहली च्या विकेटचादेखील समावेश आहे.विश्वचषकमध्ये एनगीडीला काही खास करता आले नाही. त्यामुळे, आगामी मालिकेत तो प्रभावदार खेळी करण्याचा प्रयत्न करेल.

केशव महाराज (Keshav Maharaj)

केशव महाराज (Photo Credit: Getty)

भारतीय मूळचा आफ्रिकी गोलंदाज केशव महाराज कसोटीमध्ये आफ्रिकेचा प्रमुख फिरकीपटू म्हणून उदयास आला आहे. केशव आजवर कधीही भारतीय खेळपट्टीवर खेळाला नाही, पण भारतीय फलंदाजांना मागील अनेक वर्ष फिरकीपटूंसमोर संघर्ष करताना पहिले जाऊ शकते. शिवाय, भारतीय खेळपट्टीदेखील फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त असते. त्यामुळे, आगामी मालिकेमध्ये आफ्रिकासाठी केशव महत्वाचा गोलंदाज ठरू शकतो.