भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील दुसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ पुण्यात सुरु आहे. तिसऱ्या दिवशीचा लंच ब्रेक घेण्यात आला आहे. लंचपर्यंत आफ्रिकी संघाने त्यांचे 6 विकेट गमावले आणि 136 धावा केल्या होत्या. लंच ब्रेकपर्यंत कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) आणि सेनुरन मुथुसामी (Senuran Mutthusamy) प्रत्येकी नाबाद 52 आणि 6 धावांवर खेळत होते. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आफ्रिकी फलंदाजांवर दबाव आणला होता. दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमी (Mohammed Shami) विरोधी फलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताना दिसला. दिवसाचा खेळ सुरु होण्याच्या 15 मिनिटांतच त्याने भारताला आजचे पहिले यश मिळवून दिले. एनरिच नॉर्टजे 28 चेंडूत केवळ तीन धावा करून कॅच आऊट झाला. याच्यानंतर उमेश यादव (Umesh Yadav) याने थेयूनिस डी ब्रूयन याला विकेटकीपर रिद्धिमान साहाकडे 30 धावांवर झेल बाद केले. डू प्लेसिस आणि डी कॉकने संघाचे शतक पूर्ण केले. यासह डू प्लेसिसने टेस्टमध्ये 3700० धावादेखील पूर्ण केल्या. (IND vs SA 2nd Test 2019: विकेट न मिळाल्याने दिसुन आली दक्षिण आफ्रिकेची तळमळ; मैदानावर कगिसो रबाडा आणि क्विंटन डी कॉक यांच्यात झाली शिवीगाळ, Video)

दुसऱ्या दिवशी भारताने 5 बाद 601 धावांवर पहिला डाव घोषित केला. भारताकडून कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने नाबाद 254 धावा फटकावल्या, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने 59 धावा केल्या, तर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 91 धावा करून अखेरी बाद झाला. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताकडून उमेश यादव (Umesh Yadav) याने 2 तर मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने एक विकेट मिळवली. आफ्रिकी संघाची सुरुवात काही चांगली झाली नाही. एडन मार्क्राम शून्यावर बाद झाला, डीन एल्गार 6 आणि थेयूनिस डी ब्रूयन 20 धावांवर माघारी परतला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा टेंबा बावुमा आणि एनरिच नॉर्टजे नाबाद अनुक्रमे 8 आणि 2 धावांवर खेळात होते.