IND vs SA 2nd Test 2019: विकेट न मिळाल्याने दिसुन आली दक्षिण आफ्रिकेची तळमळ; मैदानावर कगिसो रबाडा आणि क्विंटन डी कॉक यांच्यात झाली शिवीगाळ, (Video)
कगिसो रबाडा, क्विंटन डी कॉक (Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात पुण्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात असून, दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाची पकड मजबूत दिसत आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे, तर दुसऱ्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या विक्रमी दुहेरी शतकामुळे भारताने 5 बाद601 धावांवर त्यांचा डाव घोषित केला. दक्षिण आफ्रिकाकडून कगिसो रबाडा एकमेव यशस्वी गोलंदाज होता आणि त्याने तीन विकेट्स घेतले. पण, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची निराशा त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती आणि हेच कारण होते की भारताच्या पहिल्या डावाच्या 123 व्या ओव्हरमध्ये रबाडा (Kagiso Rabada) आणि क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) यांची आपापसात लढाई झाली. (India vs South Africa 2nd Test Day 3 Updates: मोहम्मद शमी ची घातक गोलंदाजी, एनरिच नॉर्टजे Out)

झाले असे की, रबाडाच्य चांगल्या चेंडूवर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने चेंडू रबाडाकडे मारला आणि त्यानंतर रबाडाने चेंडू विकेटकीपर डी कॉककडे टाकला परंतु डी कॉकचे लक्ष इतरत्र होते ज्यामुळे तो चेंडू चुकला. या दरम्यान भारतीय फलंदाजांनी वेगवान धाव चोरली. यामुळे रबाडा चिडला आणि डी कॉकवर संताप व्यक्त केला. त्याच वेळी डी कॉकवरनेही राबाडाला रागाने उत्तर दिले. आपली ओव्हर टाकल्यानंतर, रबाडा पुन्हा एकदा डी कॉककडे जात होता, जेव्हा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने मध्ये पडून आणि रबाडाला पुढे जाण्यापासून रोखले. आणि त्यानंतर दोन्ही खेळाडूंमधील प्रकरण शांत झाले. पहा या प्रसंगाचा हा व्हिडिओ:

दरम्यान, दुसर्‍या दिवशी भारताने पाच विकेट्सच्या मोबदल्यात 601 धावा केल्यावर आपला डाव घोषित केला. भारताकडून सर्वाधिक धावा केल्या जाणार्‍या कर्णधार कोहलीने 254 धावांची विशाल खेळी खेळताना अनेक विक्रम केले. दुसर्‍या दिवशी फलंदाजीसाठी आलेल्या आफ्रिकन संघाची सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी आलेल्या आफ्रिकेचे तीन फलंदाज 33 धावांच्या मोबदल्यात पॅव्हेलियनमध्ये परतले होते.