दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेचा दहावा विकेट म्हणून आर अश्विनने कगिसो रबाडा याला बाद केले. यासह भारताने 326 धावांनी आघाडी मिळवली आहे.
SA 275 in 105.4 Overs | India vs South Africa 2nd Test Day 3 Updates: आफ्रिकेचा संघ 275 धावांवर आऊट, टीम इंडिया 326 धावांनी आघाडीवर
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा कसोटी सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या दुसर्या दिवसाचा खेळ संपला असून दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 36 धावांवर तीन विकेट गमावले आहेत. दुसऱ्या दिवशी भारताने 5 बाद 601 धावांवर पहिला डाव घोषित केला. भारताकडून कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने नाबाद 254 धावा फटकावल्या, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने 59 धावा केल्या, तर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 91 धावा करून अखेरी बाद झाला. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताकडून उमेश यादव (Umesh Yadav) याने 2 तर मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने एक विकेट मिळवली. आफ्रिकी संघाची सुरुवात काही चांगली झाली नाही. एडन मार्क्राम शून्यावर बाद झाला, डीन एल्गार 6 आणि थेयूनिस डी ब्रूयन 20 धावांवर माघारी परतला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा टेंबा बावुमा आणि एनरिच नॉर्टजे नाबाद अनुक्रमे 8 आणि 2 धावांवर खेळात होते.
दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार विराटने आफ्रिकी गोलंदाजांची शाळाच घेतली. पहिल्या दिवशी कगिसो रबाडा याने सुरुवातीला भारताचे तीन गडी बाद करून मुश्किलीत टाकले होते, पण नंतर कोहलीने रहाणे आणि नंतर जडेजाच्या साथीने शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान, विराटने विक्रमी दुहेरी शतक केले. आणि टेस्टमध्ये त्याच्या सर्वाधिक धावांची नोंद केली. या मॅचमध्ये भारताने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच विराटने 250 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यासह कोणत्याही भारतीय कर्णधाराची केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या आहे आणि यादरम्यान, विराटने स्वत: चा विक्रम मोडला.