IND vs SA 1st Test 2019: भारत-दक्षिण आफ्रिका ने पहिल्या टेस्टमध्ये लगावले इतके षटकार की बनला वर्ल्ड रेकॉर्ड, वाचा सविस्तर 
रोहित शर्मा (Photo Credits: BCCI-Twitter)

टेस्ट क्रिकेटचा शॉर्ट फॉर्मेट, मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटपेक्षा बरेच वेगळे आहेत. जिथे टी-20 आणि वनडे सामने आक्रमक खेळ म्हणून पाहिले जाऊ शकतात, तर कसोटी क्रिकेट उलट सामना आहे. पण, भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील विशाखापट्टणम टेस्ट सर्वात आक्रमक कसोटी सामन्यासाठी लक्षात राहील. या सामन्यात असे इतके षटकार लगावले गेले, जे आजवर कोणत्याही कसोटी सामन्यात मारले गेले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्‍या डावापर्यंत एकूण 37 षटकार ठोकले, जो की एक विश्वविक्रम आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टेस्ट सामना कोणत्याही कसोटीतील सर्वाधिक षटकारांचा सामना ठरला आहे. 36 वा षटकार डेन पीट याने रवींद्र जडेजा याच्या चेंडू ठोकला. त्याने मिड ओवरच्या वरून चेंडू सीमारेषे पलीकडे पोहचवाल. यापूर्वी, 2014 मध्ये पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार लगावले गेले होते. त्या सामन्यात एकूण 35 षटकार ठोकले गेले होते. (IND vs SA 1st Test 2019: भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा 203 धावांनी पराभव, मालिकेत 1-0 ने मिळवली आघाडी)

दरम्यान, या मॅचमध्ये भारतीय डावात एकूण 27 षटकार आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या डावातील एकूण नऊ षटकारांचा समावेश आहे. भारताच्या पहिल्या डावात एकूण 13 षटकार, दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 7 षटकार, भारताच्या दुसर्‍या डावात 14 षटकार आणि विजयी संघाच्या दुसर्‍या डावात दोन षटकारांचा समावेश आहे. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याने एकूण 13 षटकार लगावले. त्याने पहिल्या डावात सहा षटकार आणि दुसऱ्या डावात सात षटकार ठोकले. 2005 मध्ये पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामना सर्वात जास्त षटकारांचा सामना खेळण्यात आला होता. तर, 2013 मध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात खेळलेल्या कसोटी सामन्यात 27 षटकार मारले गेले होते.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मॅचमध्ये मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) यानेदेखील पहिल्या डावात सहा षटकार लगावले. तर, रोहितने त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पहिल्या डावात 176 आणि दुसऱ्या डावात 127 धावा केल्या.