IND vs SA 1st Test 2019: भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा 203 धावांनी पराभव, मालिकेत 1-0 ने मिळवली आघाडी
रोहती शर्मा, मयंक अग्रवाल (Photo Credit: Getty)

दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध भारतीय संघाने (Indian Team) पहिल्या टेस्ट मॅचमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले आणि आफ्रिकी संघाला 203 धावांची पराभव केला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. भारताने दिलेल्या 395 धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ 191 धावांवर बाद झाला. पाचव्या दिवशी आफ्रिकेची स्थिती 8 बाद 70 धावा असताना, डेन पीट (Dane Piedt) आणि सेनुरान मुथुसामी (Senuran Muthusamy) यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाला शंभरचा टप्पा गाठण्यास सहाय्य केले.  आफ्रिकासाठी पीट आणि मुथुसामीनी नवव्या विकेटसाठी भारतविरुद्ध रेकॉर्ड 72 धावांची भागीदारी केली. पीट 56 धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला 59 व्या ओव्हरमध्ये बोल्ड केले. दोन्ही संघातील दुसरा टेस्ट सामना 10 ऑक्टोबरपासून पुणेमध्ये खेळला जाईल. भारताने पहिला डाव 502 धावांवर घोषित केला होता. याच्या प्रत्युत्तरात आफ्रिकी संघाला 431 धावा केल्या आणि भारताला 71 धावांची आघाडी मिळवळून दिली. आफ्रिकेच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला तीन विकेट घेत संघावर दबाव आणला होता. पण, डीन एल्गार याने कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) याच्या साथीने शतकी भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरला. यादरम्यान, एल्गार आणि डु प्लेसिसने अर्धशतक केले. डु प्लेसिस, त्यानंतर 55 धावा करून बाद झाला. (IND vs SA 1st Test Day 5: रविचंद्रन अश्विन याचा कमाल; मुथय्या मुरलीधरन ची बरोबरी करत बनवला सर्वात जलद 350 टेस्ट विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड)

त्यानंतर, एल्गारने क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याच्यासाथीने अजून एक शतकी भागीदारी केली आणि संघाने 300 धावांचा टप्पा गाठला., नंतर, एल्गारने शतक करत दीडशे धावांचा आकडा गाठला. एल्गारने 160 डी कॉकने 111 धावा केल्या. आणि अखेरीस संपूर्ण आफ्रिकी संघ 431 धावांवर बाद झाला. त्यानंतर, दुसऱ्या डावांत फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात काहीशी चांगली झाली नाही. मयंक अग्रवाल 7 धावा करून केशव महाराज याच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. पण, दुसऱ्या टोकावर रोहित आक्रमक फलंदाजी करत होता. मयंक बाद होताच चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला. आणि रोहितच्या साथीने त्याने शतकी भागीदारी केली. पुजारा 81 आणि रोहित 127 धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजा ने मोठे शॉट्स खेळले आणि जलद 40 धावा करत बाद झाला. कर्णधार विराट कोहली 31 आणि उपकर्णधार रोहित शर्मा 27 धावांवर नाबाद राहिले.

भारताकडून पहिल्या डावात अश्विनने सर्वात जास्त गडी बाद केले. रविचंद्रन अश्विन (R Ashwin) ने पहिल्या डावात 7 विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात मोहम्मद शमी (Mohammed Shami) ने 5, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने 4 गडी बाद केले. अश्विनला दुसऱ्या डावात 1च विकेट मिळाली.