वीरेंद्र सहवाग, एमएस धोनी (Photo Credit: IANS and Facebook)

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सध्या सुरु असलेल्या टी-20 मालिकेच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये यष्टिरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) च्या अनुपस्थितीवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामी फलंदाज वीरेंद्र सहवाग (Virender Sehwag) याने प्रश्न उपस्थित केला आहे. तो म्हणाला की कर्णधार विराट कोहली या युवा खेळाडूशी योग्य मार्गाने संवाद साधत असल्याचा मला संशय आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पॅट कमिन्सचा चेंडू डोक्याला लागल्यानंतर पंतला न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेच्या पहिल्या चार सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही आणि त्याच्या जागी केएल राहुल याला विकेटकिपिंगची जबाबदारी देण्यात आली आहे. यावर सहवागने नाराजी व्यक्त केली आणि त्याच्या सोबत झालेल्या जुन्या वादाबद्दल मोठा खुलासा केला आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) वर गंभीर आरोप केला. 2012 साली झालेल्या या वादानंतर सेहवाग यापूर्वी इतका कधीच बोलला नव्हता. पण आता जवळपास आठ वर्षानंतर सेहवागने मोठा खुलासा केला आहे. (IND vs NZ 5th T20I 2020 Match Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)

सेहवाग क्रिकबझला म्हणाला, "पंत संघातून बाहेर आहे, मग तो कसा धावा करेल? जर तुम्ही सचिन तेंडुलकरलाही बेंचवर बसवले तर त्याला धावा करता येणार नाही. तो मॅच विनर आहे असे आपल्याला वाटत असेल तर तुम्ही त्याला संघात का समाविष्ट करीत नाही?” सहवाग म्हणाला की, कर्णधाराने खेळाडूंशी योग्य संवाद साधला पाहिजे. तो म्हणाला की या प्रकरणात भारताच्या महान कर्णधारांपैकी धोनीही चुकला. 2012 ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या सीबी मालिकेचे (CB Series) उदाहरण सेहवागने दिले, "तेव्हा असे धोनी ऑस्ट्रेलियामध्ये म्हणाला की भारतीय फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल तीन फलंदाज हळू क्षेत्ररक्षक आहेत. आमच्याशी याबद्दल कधीच बोलले गेले नाही. आम्हाला माध्यमांकडून ही माहिती मिळाली." मी, सचिन आणि गौतम गंभीर टॉप क्रमात फिरवले जात असल्याचे सांगत वीरूने उदाहरण दिले. सेहवाग म्हणाले की, ड्रेसिंग रूममध्ये चर्चा चालू होती की रोहित शर्माला अधिक संधी देण्याची गरज असल्याचे कारण देत रोटेशन होत असल्याचे त्यांना सांगितले, पण धोनी माध्यमात काहीतरी वेगळंच बोलला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2012 मध्ये झालेल्या सीबी मालिकेत धोनीने पहिले तीन फलंदाज-सहवाग, गंभीर आणि सचिनला रोटेट करण्याचा निर्णय घेतला होता. सेहवाग म्हणाला की आमच्या काळात कर्णधार खेळाडूंशी चर्चा करायचे, पण कोहली करतो की नाही हे मी सांगू शकत नाही, पण लोक म्हणतात की रोहित शर्मा जेव्हा आशिया चषकात कर्णधार म्हणून गेला तेव्हा तो सर्व खेळाडूंशी बोलायचा.