भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credits: IANS)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील 5 टी-20 मालिकेचा शेवटचा सामना आज माउंट मौंगानुई (Mount Maunganui) येथे खेळला जाईल. पराभवाच्या मार्गावर शेवटचे दोन सामने जिंकणारा भारतीय संघ (Indian Team) रविवारी पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध क्लीन-स्वीप मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. भारताने जर न्यूझीलंडविरुद्ध मालिका 5-0 अशी जिंकली तर टी-20 क्रमवारीत ते पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका नंतर पाचव्या स्थानावर जाईल. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मात्र यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक पाहता प्लेयिंग इलेव्हनमध्ये प्रयोग करण्याचा विचार करीत आहे. चौथ्या सामन्यातही त्याने असच केले होते. अशा परिस्थितीत टॉरंगाच्या बे ओव्हलमध्ये होणाऱ्या शेवटच्या सामन्यासाठी विराट काही बदल करू शकेल, ज्यामुळे काही खेळाडूंना विश्रांती मिळू शकेल. (IND vs NZ: हार्दिक पंड्या Unwell! न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत नसणार टीम इंडियाचा ऑल राउंडर)

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेचा पाचवा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता वेलिंग्टनच्या वेस्टपैक स्टेडियममध्ये सुरू होईल. नाणेफेक दुपारी 12 वाजता होईल. भारत-न्यूझीलंडमधील चौथा टी-20 सामना थेट स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडी वर इंग्रजी भाषेत थेट प्रसारित होईल आणि हिंदी भाषेत स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी थेट प्रसारित केला जाईल.

सलग दोन सुपर ओव्हर सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला असेल. टीम इंडियाने यावर्षी खेळलेल्या सर्व 7 सामने जिंकले आहे, तर न्यूझीलंडला शेवटच्या 5 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, माउंट मौंगानुई हे किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनचे होम ग्राऊंड आहे, मात्र त्याच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याला चौथ्या सामन्याला मुकावे लागले होते आणि या सामन्यातूनही त्याला बाहेर राहावे लागू शकते.

असा आहे भारत न्यूझीलंड संघ

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्रा सिंह चहल, मुहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.

न्यूझीलंड: मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, केन विल्यमसन (कॅप्टन), टिम सेफर्ट (विकेटकीपर), रॉस टेलर, कॉलिन डी ग्रैंडहोम, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम साउथी, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, स्कॉट कुग्गेलैन, हमीश बेनेट.