टीम इंडियाचा (Team India) अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंड (Newzeland) विरुद्धच्या संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक सध्या अनफिट असून आगामी वनडे पाठोपाठ कसोटी मालिका सुद्धा तो खेळू शकणार नाही, अशी माहिती शनिवारी बीसीसीआय (BCCI) कडून देण्यात आली. या महिन्याच्या अखेरीस भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका होणार आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचा हा ऑल राउंडर मैदानात टीम सोबत दिसणार नाही. या मालिकेच्या दरम्यान, लंडन येथे डॉक्टर जेम्स आलीबोन यांच्याकडून हार्दिकच्या दुखापतीबाबत तपासणी होणार आहे असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.यावेळी हार्दिक सोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे फिजिओ आशीष कौशिक देखील लंडनला जाणार आहेत. भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का! सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर?
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये यूएईत झालेल्या आशिया कप स्पर्धेच्या एका सामन्यात हार्दिकच्या पाठीला दुखापत झाली होती. काही दिवसाने यातून तो बरा झाला आणि लगेचच 2019 च्या विश्वचषकात देखील खेळला. मात्र, आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेदरम्यान त्याच्या पाठीच्या दुखण्याने पुन्हा त्रास देणं सुरु केलं आणि तेव्हापासून तो टीममध्ये खेळताना दिसत नाहीये. या दुखापतीमुळेच न्यूझीलंड दौऱ्यातील टी-20 आणि वनडे संघासाठी देखील त्याचा विचार केला गेला नव्हता. आता कसोटी मालिकेला देखील तो मुकणार आहे.
दरम्यान, टी- 20 विश्वचषक सामन्याच्या नंतर त्याला फिटनेस टेस्ट पार न करता आल्याने काही काळापासून तो मैदानापासून लांबच आहे, असं असलं तरीही काही दिवसांपूर्वी टीम इंडिया मुंबईत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एक दिवसीय सामन्यासाठी असताना हार्दिक आपल्या टीमसोबत प्रॅक्टिस करताना दिसला होता.