भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यात रविवारी बेंगळरू (Bengaluru) येथे खेळण्यात आलेल्या निर्णायक सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली आहे. एकीकडे रविवारचा दिवस भारतीय संघासाठी खास ठरला असला तर, दुसरीकडे भारताचा सलामीवीर शिखर धवनला (Shikhar Dhawan) गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भारतीय संघाला न्यूझीलंड (New zealand Tour) दौऱ्याआधीच मोठा धक्का बसला आहे. तसेच दुखापतीमुळे शिखर धवन न्यूझीलंड दौरा मुकणार का? असाही प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. या विजयासह भारताने नव वर्षातील पहिली वनडे मालिका जिंकली. आता भारतीय संघाचे पुढील लक्ष्य न्यूझीलंड असणार आहे. पण या दौऱ्याआधीच भारतीय संघाला झटका बसला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या अखेरच्या सामन्यात शिखर धवनला क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पाचव्या षटकात ऍरोन फिंचने मारलेला चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात शिखर धवनच्या खांद्याला दुखापत झाली. त्यावेळी शिखर धवनला मैदान सोडावे लागले असून त्याच्या जागेवर युजवेंद्र चहलला मैदानात पाठवण्यात आले आहे. हे देखील वाचा- IND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्
बीसीसीआयचे ट्वीट-
Update: Shikhar Dhawan has gone for an X-Ray. A call on him being available for the game will be taken once he is back & assessed #TeamIndia #INDvAUS pic.twitter.com/94I4tlyxzc
— BCCI (@BCCI) January 19, 2020
शिखर धवनच्या खांद्याचे एक्स-रे काढण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, या सामन्यात शिखर धवनच्या जागी के.एल राहुलने रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात केली होती. सामना झाल्यानंतर जेव्हा शिखर मैदानात दिसला तेव्हा त्याच्या हाताला पट्टी लावण्यात आली होती. शिखरच्या दुखापतीमुळे आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी तो उपलब्ध असेल का? याबद्दल शंका निर्माण झाली आहे.