IND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्
विराट कोहली, रोहित शर्मा (Photo Credit: IANS)

ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत भारतीय संघाने (Indian Team) मालिकेच्या निर्णायक सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात विजय निश्चित करत यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. बेंगलुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारताने गोलंदाजी, फिल्डिंग आणि नंतर फलंदाजीने प्रभावी कामगिरी केली आणि सामन्यासह मालिकेतही विजय निश्चित केला. नवीन वर्षातील भारतीय संघाचा वनडेमधील पहिला मालिका विजय आहे. टीम इंडियाकडून गोलंदाजीत मोहम्मद शमी (Mohammed Shami), तर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांनी फलंदाजीने प्रभाव पडला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने 47.3 ओव्हरमधेच पूर्ण केले. या तिसर्‍या वनडे सामन्यात दोन्ही संघांनी बरेच उत्कृष्ट आणि मनोरंजक विक्रमांची नोंद केली. या जाणून घ्या: (IND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय)

1. ऑस्ट्रेलियाचा हा भारतीय भूमीवरील 29 वा विजय होता. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये भारतीय भूमीवर एकूण 63 सामने खेळले गेले आहेत. यातील 30 मध्ये ऑस्ट्रेलिया, तर 28 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे.

2. स्टीव्ह स्मिथने आज आपल्या वनडे कारकिर्दीतील 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. स्मिथने एकूण 106 डावांमध्ये ही कामगिरी केली.

3. स्मिथने आज वनडे कारकिर्दीतील 9 वे शतक झळकावले. त्याने एकदिवसीय कारकीर्दीत 24 अर्धशतकंही केली आहेत.

4. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आज आपल्या ए लिस्ट कारकीर्दीतील 200 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. शमीने आजच्या संपूर्ण सामन्यत एकूण चार गडी बाद केले.

5. आज रोहितने 4 धावा करताच त्याच्या वनडे कारकिर्दीतील 9000 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये 9000 धावा करणारा तो 7 वा खेळाडू बनला आहे. शिवाय रोहितने तिसरे सर्वात जलद या कामगिरीची नोंद केली. रोहितने 217 डावात हा पराक्रम केला.

6. रोहितने आज वनडे कारकीर्दीत आपले 29 वे शतक ठोकले. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये त्याने 43 अर्धशतकंही केली आहेत.

7. कोहलीनेही आज कर्णधार म्हणून वनडे सामन्यात 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि भाराच्या एमएस धोनी यांनी हा पराक्रम केला आहे.

8. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 11,208 धावा केल्या आहेत. त्याने धोनीला मागे सोडले आणि कर्णधार म्हणून भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटयामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा फलंदाज बनला.

9. रोहितने आजच्या सामन्यात 29 वे शतक नोंदवले. शिवाय, ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे त्याचे आठवे शतक होते. या सामन्यात शतक करत रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतकांच्या बाबतीत कर्णधार कोहलीची बरोबरी केली. दोंघांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 शतकं केली आहेत. कांगारूविरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावर आहे. त्याने एकूण 9 शतकं केली आहेत.

10. ऑस्ट्रेलियाचा हा भारताचा 52 वा विजय होता. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये एकूण 139 सामने खेळले गेले होते. यातील ऑस्ट्रेलियाने 78 सामने जिंकले, तर भारताने 51 सामने जिंकले. आणि 10 सामने अनिश्चित राहिले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध या मालिकेतील विजयानंतर भारत 24 जानेवारीपासून न्यूझीलंड दौऱ्यावर 5 टी-20, 3 वनडे आणि 2 सामन्यांची टेस्ट मालिका खेळेल. मागील वर्षांपासून टीम इंडिया चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आणि पुढे देखील ते त्यांच्या खेळात सततता कायम ठेवतील अशीच सर्व प्रेमी अपेक्षा करत असतील.