IND vs NZ 3rd T20: सूर्यकुमार यादव तिसऱ्या टी-20 सामन्यात करु शकतो 'हा' मोठा विक्रम, शिखर धवन आणि केएल राहुलला टाकू शकतो मागे
Surya Kumar Yadav (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज अहमदाबादमध्ये खेळवला (Ahmedabad's Narendra Modi Stadium) जाणार आहे. हा सामना सायंकाळी 7.00 पासून सुरू होईल. दुसरा टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत बरोबरी साधली आहे. आता आजचा सामना जिंकून ती मालिका काबीज करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल. या सामन्यात विजयासाठी स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला फलंदाजी करणे अत्यंत आवश्यक आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) नाबाद 26 धावा केल्या. त्याचवेळी, पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने 47 धावांची खेळी केली.

यादरम्यान सूर्यकुमार यादवने टीम इंडियाचे माजी खेळाडू एमएस धोनी आणि सुरेश रैना यांना मागे टाकले आहे. आता दुसऱ्या टी-20 मध्ये सूर्यकुमार यादवच्या निशाण्यावर टीम इंडियाचा दिग्गज सलामीवीर शिखर धवनचा विक्रम आहे. हा विक्रम मोडण्यासाठी सूर्यकुमार यादवला दमदार धावा कराव्या लागतील. (हे देखील वाचा: IND vs NZ 3rd T20: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आज अंतिम सामना, सर्वांच्या नजरा असणार 'या' दिग्गज खेळाडूंकडे)

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने T20 च्या 45 डावांमध्ये 178.76 च्या स्ट्राइक रेटने 1651 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव हा T20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू असून त्याच्या नावावर एकूण 13 अर्धशतके आणि तीन शतके आहेत. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर आहे. शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने एमएस धोनी आणि सुरेश रैना यांना मागे टाकत हे स्थान मिळवले.

न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादव या यादीत चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. यासाठी सूर्यकुमार यादवला स्फोटक खेळी खेळावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात सूर्यकुमार यादवने 109 धावा केल्या तर तो या यादीत चौथ्या क्रमांकावर येईल. शिखर धवर सध्या या यादीत चौथ्या स्थानावर आहे. शिखर धवरने एकूण 1759 धावा केल्या आहेत.

टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

विराट कोहली - 4008

रोहित शर्मा - 3853

केएल राहुल - 2265

शिखर धवन - 1759

सूर्यकुमार यादव - 1651