IND vs ENG Test Series 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाला (Team India) 8 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. आयसीसी विजेतेपदाच्या निर्णायक सामन्यानंतर आता भारताला यजमान इंग्लंडविरुद्ध (England) 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत टीम इंडियाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकचा (Alastair Cook) असा विश्वास आहे की आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत चेंडूची हालचाल झाल्यास यजमान संघासमोर भारताला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुक म्हणाला, “भारतीय संघ (Indian Team) शानदार आहे. पण चेंडूची हालचाल झाल्यास इंग्लंड दबाव निर्माण करू शकतो. ऑगस्टमध्ये जर परिस्थिती अशीच राहिली आणि खेळपट्टीवर ओलावा असेल तर इंग्लंडचा वरचष्मा असेल.” (IND vs ENG Series 2021: भारताविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी ब्रिटिश कर्णधार Joe Root ने या मोठ्या बदलाची केली मागणी)
बीबीसी टेस्ट मॅच स्पेशल पॉडकास्टमध्ये कूकमध्ये कुक म्हणाला की, “भारताकडे जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत परंतु त्यांची कमजोरी सिम आणि चेंडू स्विंग करणे आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर दबाव आणला जाऊ शकतो.” 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध भारत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याबाबत तो म्हणाला की, हवामानाची स्थिती लक्षात घेता भारताने एक अतिरिक्त वेगवान गोलंदाजाऐवजी दोन फिरकीपटू निवडून चूक केली. कूक पुढे म्हणाला की, “सामन्यादरम्यान पाऊस पडेल हे त्यांना ठाऊक असतानाही सामन्याच्या तीन दिवस आधी संघ निवडणे आणि दोन फिरकीपटू उभे करणे हे अतिविश्वासू होते.” कुक म्हणाला की, भारताच्या पराभवाचे एक कारण मॅच प्रॅक्टिसचा अभाव देखील होता.
2010 ते 2016 दरम्यान ब्रिटिश संघाचे नेतृत्व करणाऱ्या कूकने म्हटले की, कोविड-19 निर्बंधांमुळे स्पर्धेपूर्वी त्यांना आवश्यक असणाऱ्या सरावापासून वंचित ठेवल्यामुळे त्यांनी पूर्वीच भारत डब्ल्यूटीसीचा अंतिम सामन्यात पराभूत होईल याबाबत भविष्यवाणी केली होती. विजेतेपदाच्या स्पर्धेपूर्वी विराट कोहली आणि संघाला प्राप्त झालेला एकमेव सराव सामना म्हणजे इंट्रा-स्क्वाड सामना होता, ज्यामध्ये अनेकदा योग्य कसोटीची तीव्रता नसते.