IND vs ENG 5th T20I Live Streaming: अहमदाबाद (Ahmedabad) येथे पाच सामन्यांच्या मालिकेच्या अखेरच्या आणि निर्णायक टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) संघ सज्ज आहेत. कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ (Indian Team) आता टी-20 मालिका जिंकण्यासाठी देखील उत्सुक आहे. दोन्ही उभय संघातील ही मालिका सध्या 2-2 अशा बरोबरीत असून अखेरच्या सामन्यातील विजयी संघ मालिकेतही बाजी मारेल. यंदा भारतात आयोजित होणाऱ्या वर्ल्ड टी-20 पूर्वी ही अखेरची मालिका असेल. भारत आणि इंग्लंड संघातील पाचव्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल तर 6:30 वाजता टॉस होईल. या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील. शिवाय, Disney+ Hotstar अॅप आणि वेबसाइटवर चाहते सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. स्टार स्पोर्ट्स 5 भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू आणि तामिळ) सामना लाईव्ह प्रसारित करणार आहे. (IND vs ENG T20I 2021: Suryakumar Yadav आणि Ishan Kishan यांच्या आंतरराष्ट्रीय यशात कोणाचे योगदान, सचिन तेंडुलकर यांनी ‘याला’ दिले श्रेय)
आव्हानात्मक परिस्थितीत इंग्लंडला मात देत आत्मविश्वासाने भरलेली टीम इंडिया मालिकेच्या निर्णायक सामन्यात देखील विजयाचा दावेदार असेल. सलामीच्या जोडीत भारतीय संघाला संघर्ष करावा लागत असला तरी विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांच्या रूपात संघाकडे मोठे फटके खेळणारे फलंदाज उपलब्ध आहेत. शिवाय, भारतीय गोलंदाज देखील संघर्ष करताना दिसत आहेत. दुसरीकडे, यजमान संघाला इंग्लिश गोलंदाज मार्क वूड, आदिल रशीद आणि जोफ्रा आर्चर यांच्याकडून सावध राहण्याची गरज आहे. शिवाय, फलंदाजीत जेसन रॉय, जोस बटलर आणि बेन स्टोक्स घात करू शकतात. त्यामुळे, आजच्या निर्णायक सामन्यात कोणता संघ बाजी मारेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून असेल.
असा आहे भारत-इंग्लड टी-20 संघ
भारताचा टी-20 संघ: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवतिया आणि ईशान किशन (राखीव विकेटकीपर).
इंग्लंड टी-20 संघ: इयन मॉर्गन (कॅप्टन), जोस बटलर, जेसन रॉय, लियम लिविंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल राशिद, रीस टॉपले, क्रिस जॉर्डन, मार्क वुड, सॅम कुरन, टॉम कुरन, सॅम बिलिंग्स, जॉनी बेयरस्टो आणि जोफ्रा आर्चर.