सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन (Photo Credit: PTI)

IND vs ENG T20I 2021: भारताचे माजी फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हणाले की, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांच्या आंतरराष्ट्रीय स्टेजवरील यशाचे कारण इंडियन प्रीमियर लीगला जाते. आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळणाऱ्या या दोन्ही फलंदाजांनी टी-20 मध्ये भारताकडून (India) पदार्पण केले असून दोघांनीही पहिल्या डावात शानदार अर्धशतके झळकावली होती. सचिन म्हणाला की, सूर्या आणि ईशान दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पूर्णपणे तयार आहेत आणि त्यासाठी मी सुरुवातीपासूनच मानत आहे की याचे संपूर्ण श्रेय आयपीएलला जाते. सचिनने कबुल केले की लीगमधील खेळाडूंना जागतिक स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाला आणि त्याचा त्यांना मोठा फायदा झाल्याने टीम इंडियाच्या बेंच सामर्थ्यासाठी आयपीएलचे मोठे योगदान आहे. “सूर्य आणि ईशान दोघेही खेळायला तयार आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे, मला नेहमीच असे वाटले आहे की आयपीएलच्या खेळामुळे खेळाडूंना मदत झाली आहे,” सचिनने PTI ला सांगितले. (सूर्यकुमार यादवच्या T20 आंतरराष्ट्रीय करिअरची दणक्यात सुरूवात, रोहित शर्माचे 10 वर्षांपूर्वीचे ‘ते’ एक ट्विट व्हायरल)

“कारण जेव्हा आम्ही खेळलो होतो तेव्हा मी वसीम (अक्रम) विरुद्ध खेळलो नव्हतो, जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये खेळलो होतो तेव्हा मी (शेन) वॉर्न किंवा (क्रेग) मॅक्डर्मोट किंवा मर्व ह्यूजेस खेळलो नव्हतो. आम्ही तिथे गेलो आणि काय झाले आहे याचा शोध घ्यावा लागला. आयपीएलच्या मदतीने, काल मी हा खेळ पाहत होतो, आणि सूर्य फलंदाजी करीत होता आणि (जोफ्रा) आर्चरने त्याला आणि बेन स्टोक्सला गोलंदाजी केली आणि टीकाकार म्हणाले की सूर्यासाठी हे काही नवीन नाही कारण तो राजस्थान रॉयल्सविरुद्ध आधीच खेळला आहे,” सचिन म्हणाला. मास्टर-ब्लास्टरने पुढे म्हटले की, “आर्चर आणि स्टोक्स दोघेही राजस्थान रॉयल्सकडून खेळतात, त्यामुळे ते वेगळे काही नाही आणि ते (सूर्य) याला माहित आहे की ते काय करतात आणि त्याने त्यांच्याविरूद्ध आधीच खेळले आहे. त्यामुळे, ही पहिली वेळ नव्हती. हे एकच कारण आहे की मी असे म्हणत आहे की हे दोघेही भारताकडून खेळण्यास तयार आहेत आणि हेच आमच्या संघाची बेंच सामर्थ्य दाखवते, जी खरोखरच मजबूत आहे. त्यामुळे आता आमच्या क्रिकेटची सुंदरता आहे की असंख्य खेळाडू आहेत, जे बाहेर जाण्यास तयार आहेत.”

अहमदाबाद येथे झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमारने आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला आणि शानदार अर्धशतक झळकावले. सूर्यकुमारच्या 32 चेंडूत 57 धावांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर टीम इंडियाने चौथ्या सामन्यात धावांचा डोंगर उभारला आणि अखेर मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. यानंतर आता अंतिम सामना 22 रोजी खेळला जाणार आहे ज्यात विजयी संघ मालिका काबीज करेल.