IND vs ENG 3rd Test 2021: इंग्लंडच्या माजी कर्णधाराने हेडिंग्ले टेस्ट सामन्यात Virat Kohli याच्या कॅप्टन्सीवर उपस्थित केले प्रश्न, टीम इंडियाला सुनावले खडे बोल
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

Michael Vaughan Questions Virat Kohli: भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) कर्णधारपदावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही त्याच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असताना, लीड्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी केल्यामुळे कोहलीवर टीका करण्यात येत आहे. आता इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) यांनी कोहलीच्या निर्णयांवर पुन्हा टीका केली आहे. वॉनने दुसऱ्या दिवशी कोहलीने घेतलेल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोहलीने ईशांत शर्मासह (Ishant Sharma) दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. इंग्लंडने दुसऱ्या दिवसाची सुरुवात बिनबाद 120 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. आर अश्विनला तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर बसवण्यापासून लीड्सवर पहिले फलंदाजी घेण्याच्या निर्णयापर्यंत, कर्णधारपदाच्या अनेक निर्णयांमुळे कोहली चर्चेत आला आहे. (IND vs ENG 3rd Test: लॉर्ड्सचा शतकवीर KL Rahul लीड्सच्या दुसऱ्या डावातही फेल, जॉनी बेअरस्टोने स्लिपमध्ये पकडला जबरदस्त कॅच)

“तुम्ही दिवसाच्या खेळाची सुरुवात बघत आहात. इशांत शर्मा हा कालपर्यंतचा सर्वात वाईट भारतीय वेगवान गोलंदाज होता. तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर सुरुवात करा, एका तासात जे तुम्हाला जिंकायचे आहे, तुम्ही नक्कीच तुमच्या सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे जायला हवे. शमीने काल कोणत्याही कारणास्तव नवीन चेंडू घेतला नाही. आणि विराटला याचे उत्तर द्यावे लागेल आणि त्याला त्याचे जोरदार उत्तर द्यावे लागेल,” वॉन टेस्ट मॅच स्पेशल पॉडकास्टवर म्हणाला. लॉर्ड्समध्ये अविश्वसनीयपणे यशस्वी मोहिमेनंतर भारताने हेडिंग्लेमध्ये खराब सुरुवात केली आणि पहिल्या डावात फक्त 78 धावांवर ऑलआऊट झाले. बॅट असो किंवा चेंडू असो, भारतीयांना लॉर्ड्सवर विजय मिळवलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. वॉनला वाटते की भारतीय संघाला लीड्समधील परिस्थितीशी जुळवून घेणे कठीण जात आहे.

“परिस्थितीशी जुळवून घेणारा जगातील सर्वोत्तम संघ. हा भारतीय संघ एक चांगला संघ आहे, परंतु जोपर्यंत ते प्रत्यक्षात येण्यास आणि वेगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे हे स्वीकारण्यास तयार नाहीत तोपर्यंत ते महान संघांसोबत असू शकत नाहीत,” इंग्लंडचे माजी कर्णधार पुढे म्हणाले. पहिल्या दोन दिवसांच्या खेळाबद्दल भारतीय संघाचे मूल्यांकन करताना, वॉन कोहलीच्या संघाला 'गरीब संघ' असे संबोधण्यास मागे हटले नाही आणि लॉर्ड्सवर विजय मिळवणाऱ्या मागून पुढे येणाऱ्या संघाचे काय झाले असा प्रश्न विचारला.