IND vs ENG 3rd Test: लॉर्ड्सचा शतकवीर KL Rahul लीड्सच्या दुसऱ्या डावातही फेल, जॉनी बेअरस्टोने स्लिपमध्ये पकडला जबरदस्त कॅच (Watch Video)
इंग्लंड विरुद्ध भारत (Photo Credit: Twitter/englandcricket)

IND vs ENG 3rd Test Day 3: लीड्स कसोटीच्या (Leeds Test) पहिल्या डावात खाते न उघडणाऱ्या केएल राहुलला (KL Rahul) दुसऱ्या डावातही फारसे काही करता आले नाही. राहून ने 8 धावा केल्या आणि क्रेग ओव्हरटनच्या (Craig Overton) गोलंदाजीवर स्लिपमध्ये जॉनी बेअरस्टोच्या (Jonny Bairstow) हाती झेलबाद झाला. तिसऱ्या दिवशी लंचच्या वेळी भारताचा स्कोअर 34 धावांवर 1 विकेट असा होता. तत्पूर्वी, केएल राहुलला नशिबाने साथ दिली. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाचा स्कोर 16 धावा असताना ओली रॉबिन्सनचा चेंडू त्याच्या पॅडवर आदळला. आणि इंग्लिश खेळाडूंच्या LBW च्या आवाहनावर मैदानावरील अंपायरने बोट उचलले. यानंतर केएल राहुलने निर्णयाला चॅलेंज देत एक रिव्ह्यू घेतला आणि बॉल ट्रॅकिंगमध्ये स्पष्ट झाले बॉल लेग साईडच्या दिशेने जात आहे. अशाप्रकारे राहुलला जीवनदान मिळाले. (IND vs ENG: 2021 वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये घोंगावतय Joe Root चे वादळ; ना रोहित शर्मा ना अजून कोणी देत आहे इंग्लंड कॅप्टनच्या सिंहासनाला आव्हान)

तत्पूर्वी, हेडिंग्ले येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारताच्या बाजूने झाली आणि गोलंदाजांनी ओव्हरटन आणि रॉबिन्सनच्या जोडीला जास्त काळ खेळू दिले नाही. पहिले क्रेग ओव्हरटनला पायचीत करत मोहम्मद शमीने 32 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने ओली रॉबिन्सनचा त्रिफळा उडवत इंग्लंडचा डाव गुंडाळला. त्यानंतर दुसऱ्या डावात रोहित-राहुलची जोडी पुन्हा एकदा सलामीला उतरली पण इंग्लिश गोलंदाजांनी त्यांच्या मुक्तपणे खेळू दिले नाही. दोंघांनी संघाला पहिल्या सत्रात सावध सुरुवात करून दिली. तथापि लंचब्रेकपूर्वीच्या अंतिम चेंडूवर बेअरस्टोने एक अप्रतिम झेल पकडला ज्याचे सध्या संपूर्ण सोशल मीडियावर कौतुक होत आहे. बेअरस्टोने डावीकडे उडू घेतली आणि एका हाताने अफलातून झेल घेत सर्वांना चकित केले. फलंदाज राहुल देखील हा झेल पाहून आश्चर्यचकित झाला. अशाप्रकारे भारताची पहिली विकेट 34 धावांवर पडली. आतापर्यंत स्लिपमध्ये पकडलेला एक उत्कृष्ट स्लिप झेल आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

यापूर्वी दिवसाच्या सुरुवातीला टीम इंडियाच्या पहिल्या डावात केलेल्या 78 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ 432 धावांवर ऑलआऊट झाला. आणि भारतावर 354 धावांची आघाडी घेतली त्यामुळे आता जर भारताला कसोटी सामना वाचवायचा असेल तर 354 पेक्षा जास्त धावा करण्याची गरज आहे.