बेन स्टोक्सचे स्टंट (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 2nd Test Day 3: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात चेन्नईमध्ये (Chennai) सुरु असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यादरम्यान पाहुण्या संघाचा टीमचा अष्टपैलू बेन स्टोक्सने (Ben Stokes) आपल्या आश्चर्यकारक स्टंटने चाहत्यांचे चांगलेचमनोरंजन केले. इंग्लंडचा अष्टपैलू स्टोक्स मैदानात प्रभावीपणे सक्रिय असतो. मग तो गोलंदाजी असो किंवा फलंदाजी. किंवा विरोधी खेळाडूंना स्लेज करणे स्टोक्स सर्वच बाबतीत पुढे असतो आणि आज मैदानावरील आपल्या कृतीने त्याने हे पुन्हा दाखवून दिलं आहे. चेन्नई कसोटी (Chennai Test) सामन्याच्या तिसर्‍या दिवशी भारताच्या दुसर्‍या डावादरम्यान बेन स्टोक्सने आपल्या स्टंटने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. क्षेत्ररक्षण दरम्यान, स्टोक्सने दोन्ही पाय उंचावले आणि त्याच्या हातावर चालू लागला. स्टोक्सचा हा स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. स्टोक्सच्या हँडस्टँडला प्रेक्षकांनीही प्रचंड टाळ्यांनी प्रतिसाद दिला आणि ट्विटर यूजर्सनेही अष्टपैलूचे कौतुक केले. (IND vs ENG 2nd Test 2021: बेन फोक्सनंतर जो रूटच्या कमेंटने संतापला Rishabh Pant, मैदानावर केले असे काही (Watch Video))

तिसऱ्या दिवसाच्या दुसर्‍या सत्रादरम्यान ही घटना घडली जेव्हा विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. तत्पूर्वी, विराट कोहली आणि अश्विन दोघांनीही सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अर्धशतकी टप्पा गाठला. संघ अडचणीत असताना दोघांमध्ये सातव्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे संघाने दुसऱ्या डावात आघाडी चारशे पार नेली. यजमान संघाने दुसऱ्या दावत 156 धावांवर 6 विकेट गमावले असताना विराट आणि अश्विनने फलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेतली.  पहा स्टोक्सचा हँडस्टँड:

दुसरीकडे, कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी रिषभ पंत आणि स्टोक्स यांच्यात वाद झाल्याचं दिसून आलं. हे प्रकरण तापलेले पाहून मैदानावरील पंचांना हस्तक्षेप करावा लागला आणि वातावरण शांत केले. शिवाय, पहिल्या डावात फलंदाजी करताना अश्विनच्या सुंदर चेंडूवर पहिल्या डावात स्टोक्स बोल्ड झाला त्यानंतर इंग्लंड अष्टपैलूने स्वतःवरील ताबा गमावला. स्टोक्स ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात असताना आपले हेल्मेट जमिनीवर फेकले आणि लाथ मारली. व्हिडिओमध्ये स्टोक्स खूप संतप्त झाल्याचे स्पष्ट दिसून येत होते आणि त्याने हेल्मेट देखील उचलले नाही.