IND vs ENG 2nd Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघादरम्यान चेन्नईच्या (Chennai) एम. ए. चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणार्या दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात भारतीय विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आणि विरोधी संघाचा यष्टीरक्षक खेळाडू बेन फोक्स (Ben Foakes) यांच्यात मॅचदरम्यान शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. विरोधी संघाचा कर्णधार जो रूट (Joe Root) गोलंदाजी करत असताना ही घटना पहायला मिळाली. विकेटच्या मागून फोक्स पंतवर सतत भाष्य करीत होता, ज्यामुळे तो चिडला आणि मधेच उभा राहून त्याच्याकडे टक लावू पाहत राहिला. यादरम्यान, पंतजवळून जात असताना कर्णधार रूट देखील काहीतरी बोलला जेणेकरून युवा फलंदाज आणखी संतापला आणि मैदानावरील अंपायरला हस्तक्षेप करून पंत आणि इतर खेळाडूंची समजावून घालावी लागली. या वादा दरम्यान विरोधी संघाचा उपकर्णधार बेन स्टोक्ससुद्धा (Ben Stokes) पंतला स्पष्टीकरण देताना दिसला. (IND vs ENG 2nd Test 2021: रिषभ पंतचे दमदार अर्धशतक, टीम इंडियाचा पहिला डाव 329 धावांवर आटोपला; मोईन अलीने घेतल्या सर्वाधिक विकेट्स)
दरम्यान, पहिल्या दिवसाखेर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 300 धावांपर्यंत मजल मारली. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी रूटच्या गोलंदाजीदरम्यान इंग्लंडच्या जवळच्या क्षेत्ररक्षकांनी काही भाष्य केले ज्यावर पंत आपली बॅट मागे उभी करून त्या क्षेत्ररक्षकाशी बोलू लागला. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या स्टोक्सकडे वळून त्याने काहीतरी म्हटले. नंतर, ओव्हर संपल्यावर तो इंग्लंडचा कर्णधार रूटशीही बोलला. स्टोक्सही जेव्हा खेळपट्टीजवळ आला तेव्हा त्याने देखील पंतशी बरीच चर्चा केली. अंपायर वीरेंद्र शर्मानंतर पंत आणि इंग्लंड खेळाडूंशी बोलून मध्यस्थी केली. हे सर्व घडत असताना क्रिकेट चाहत्यांनी चेपॉक स्टेडियममध्ये पंतच्या नावाची जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पहा व्हिडिओ
बेन फोअक्स 🏴 , बेटा, उसका नाम ऋषभ पंत @RishabhPant17 है । उस से पंगे ना लीयो । वो विकेट के ऊपर ही नहीं, विकेट पे पीछे से तुम्हारी गौरी गौरी 🍑 मार मार के ♨️ लाल कर देगा । #INDvENG #ENGvIND #RishabhPant pic.twitter.com/ArLXxg3EtJ
— Sachin Budania (@SachinBudania11) February 13, 2021
दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच टीम इंडियाचा पहिला डाव 329 धावांवर संपुष्टात आला. रोहित शर्माने सर्वाधिक 161 धावा केल्या तर अजिंक्य रहाणेने 67 आणि रिषभ पंत नाबाद 58 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. ओली स्टोनला 3, जॅक लीचला 2 आणि कर्णधार जो रूटला 1 विकेट मिळाली.