रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2nd Test Day 3: चेन्नईच्या (Chennai) एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध (England) सुरु असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात ऑफस्पिनर आर अश्विनने (R Ashwin) सोमवारी टर्निंग ट्रॅकवर फलंदाजीचा मास्टरक्लास खेळी केली. अश्विनने पहिले इंग्लंडच्या फलंदाजांला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत 43 धावा देत 5 विकेट घेतल्यानंतर, तिसऱ्या दिवशी बॅटने देखील जबरदस्त कामगिरी करत पाचवे कसोटी शेतक ठोकले. अश्विनने इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात 134 चेंडूंत आपले दुसरे शतक झळकावले. त्याने स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना आनंदित यापूर्वी 47 चेंडूत अर्धशतकी धावसंख्या गाठली. अश्विनने इंग्लंड गोलंदाजांवर हल्ला चढवत पाहुण्या संघावर पलटवार केला आणि जॅक कॅलिस, गॅरी सोबर्स, साकिब अल हसन आणि मुश्ताक मोहम्मदला मागे सोडत सामन्यात तिसऱ्यांदा शतक आणि 5 विकेट घेतल्या. (IND vs ENG 2nd Test Day 3: रविचंद्रन अश्विनची एकाकी झुंज, टीम इंडियाची दुसऱ्या डावात धावा; इंग्लंडपुढे विजयासाठी 482 धावांच आव्हान)

पॉली उमरीगर आणि विनू मंकड अशी अद्वितीय अष्टपैलू कामगिरी करणारे इतर भारतीय क्रिकेटपटू आहेत. इयान बोथमनंतर दोनपेक्षा जास्त वेळा एकाच सामन्यात 5 विकेट आणि शतकी गाठणारा अश्विन आता एकमेव खेळाडू ठरला आहे. इतकंच नाही तर आपल्या घरच्या चेपॉक स्टेडियमवरील देखील अश्विनचे हे पहिले शतक ठरले. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात घरच्या संघाने पाच विकेट गमावल्या. परंतु विराट कोहलीने अश्विनसह 96 धावांची भागीदारी करत न्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर मालिकेच्या बरोबरीच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. अश्विनने चेन्नईच्या कठीण खेळपट्टीवर जोरदार फलंदाजी करताना 134 चेंडूत शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटची चार शतके केले असून इंग्लंडविरुद्ध हे पहिले शतक आहे. पहिल्या दिवशीपासून चेन्नईच्या खेळपट्टीवर इंग्लंडचे अनेक माजी खेळाडू प्रश्न उपस्थित करत होते. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना पहिल्या दिवसापासून मदत करीत होती. पहिल्या डावात इंग्लंडचा डाव 134 धावांवर आटोपला तेव्हा माजी खेळाडूंनी खेळपट्टीला दोष देणे सुरू केले पण दुसऱ्या डावात अश्विनने ज्या प्रकारे शतक झळकावले होते, त्यानंतर त्यांची बोलती नक्कीच बंद झाली असेल.

दरम्यान, शतक साजरं केल्यानंतर अश्विन फार वेळ मैदानात टीकू शकला नाही. ओली स्टोनने त्याला 106 धावांवर त्रिफळाचित करत माघारी पाठवलं. अशाप्रकारें, यजमान भारतीय संघाने दुसऱ्या डावात 286 धावा करत इंग्लंडसमोर 482 धावांचे तगडे आव्हान दिलं आहे.