England's Likely Playing XI For 2nd ODI: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील दुसरा एकदिवसीय सामना 26 मार्च रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Maharashtra Cricket Association) स्टेडियमवर खेळला जाईल. पहिल्या वनडे सामन्यात भारताने इंग्लंडला 66 धावांनी पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पुणे येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला दोन खेळाडूंच्या दुखापतींचा फटका बसला आहे. कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) आणि फलंदाज सॅम बिलिंग्स (Sam Billings) यांना सामन्या दरम्यान दुखापत झाली ज्यामुळे दोघे पूर्ण क्षमतेने सामन्यात खेळू शकले नाही. त्यामुळे, या दोन्ही खेळाडूंची दुखापत दुसऱ्या वनडे सामन्यासाठी इंग्लिश टीम मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाडण्यात भाग पाडू शकते. सॅम बिलिंग्जच्या कॉलर हाडांमध्ये ताण आला तर इयन मॉर्गनच्या बोटांना दुखापत झाल्याने चार टाके घालण्यात आले. (IND vs ENG 2nd ODI 2021: सूर्यकुमार यादवला वनडे पदार्पणाची संधी, टीम इंडियामध्ये दुसऱ्या सामन्यासाठी होऊ शकतात 3 बदल, पहा संभावित Playing XI)
मॉर्गन सामन्यासाठी फिट नसल्यास त्याच्या जागी जोस बटलर संघाचे नेतृत्व करेल. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोची प्रभावी जोडी पुन्हा एकदा इंग्लंडकडून डावाची सुरुवात करतील. दुसरीकडे, मॉर्गन आणि बिलिंग्सना सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते व त्यांच्या जागी लियाम लिविंगस्टोन आणि रीस टोपली यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. लिविंगस्टोनने यापूर्वी 2017 मध्ये टी-20 डेब्यू केले होते मात्र त्याला वनडे संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. अशास्थितीत, मॉर्गनची दुखापत लिविंगस्टोनसाठी सुवर्ण संधी सिद्ध होऊ शकते. बेन स्टोक्स, रीस टोपली आणि मोईन अलीवर मधल्या फळीत संघाची धावसंख्या वाढवण्याची जबाबदारी असेल. गोलंदाजी विभागात संघात बदल दिसत नाही. टॉम कुरन मागील सामन्यात प्रभावी ठरला नसला तरी संघात त्याचे स्थान कायम राहू शकते. सॅम कुरन आणि मार्क वूड अन्य वेगवान गोलंदाज असतील तर आदिल रशीद संघात एकमेव फिरकीपटू असेल.
पहा इंग्लंडचा संभावित प्लेइंग इलेव्हन: जोस बटलर (कॅप्टन/विकेटकीपर), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, लियाम लिविंगस्टोन, बेन स्टोक्स, रीस टोपली, मोईन अली, सॅम कुरन, टॉम कुरन, आदिल रशीद आणि मार्क वुड.