गुलाबी चेंडू (Photo Credits: IANS)

शुक्रवारपासून कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर सुरु होणाऱ्या 2 सामन्यांच्या टेस्ट मालिकेच्या दुसर्‍या आणि अंतिम सामन्यात बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध टेस्ट इंडिया (India) पहिल्यांदा गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात प्रवेश करण्यास तयार आहे. कसोटी क्रिकेटमधील नवीन नाविन्यपूर्ण बदलांवरील विरोधानंतर टेस्ट मॅच पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी आणि टीव्ही प्रेक्षक वाढविण्याच्या उद्देशाने भारत पिंक बॉल टेस्ट (Pink Ball) खेळण्यास सज्ज आहे. 2015 मध्ये डे-नाईट टेस्टला यशस्वीरित्या सुरुवात झाली, पण आजवर टीम इंडियाने पिंक बॉलने खेळण्यास दुविधा व्यक्त केली होती. पण, टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने बीसीसीआयचे अध्यक्ष बनल्याच्या काही महिन्यातच या प्रस्तावाला मान्यता दिली. सध्या सुरू असलेल्या मालिकेआधी गांगुलीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला फ्लडलाईट अंतर्गत कसोटी खेळण्याचे प्रस्ताव पाठवला होता, जो त्यांनी स्वीकारला आणि आता गांगुलीने ईडन गार्डन्समध्ये यासाठी भव्य अशी व्यवस्था केली आहे. (IND vs BAN Day/Night Test: विराट कोहली याच्याकडे विश्वविक्रम नोंदवण्याची संधी, कोणताही भारतीय कर्णधार नाही करू शकला 'ही' कामगिरी)

भारत-बांग्लादेश दुसऱ्या टेस्ट मॅचचं लाइव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स (Star Sports) 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडी इंग्रजी कॉमेंट्रीमध्ये आणि स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी हिंदी भाषामध्ये पाहता येईल. शिवाय, लाइव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग हॉटस्टार (Hotstar) वर उपलब्ध असेल. शिवाय तुम्ही या सामन्याचे थेट प्रक्षेपण आमच्या यूट्यूब चॅनेलवर पाहू शकता.

यापूर्वी, दोन्ही संघात इंदोर मध्ये मालिकेतील पहिला सामना खेळला गेला होता. यात फक्त तीन दिवसात टीम इंडियाने डाव आणि 130 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता ईडन गार्डनमध्ये ऐतिहासिक सामना खेळत टीम इंडिया सलग तिसऱ्या मालिकेत क्लीन-स्वीप करण्याच्या निर्धारित असेल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताने 6 मॅचमध्ये 300 गुण मिळवत आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहेत.

असा आहे भारत आणि बांग्लादेशचा टेस्ट संघ:

टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, हनुमा विहारी, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत, कुलदीप यादव आणि उमेश यादव.

टीम बांग्लादेश: मोमीनुल हक (कॅप्टन), अल-अमीन-हुसेन, इम्रुल कायस, शादमन इस्लाम, सैफ हसन, महमूदुल्ला, मोसद्देक हुसेन, मेहेदी हसन, लिटन दास, मुश्फिकुर रहीम, मोहम्मद मिथुन, तैजुल इस्लाम, नईम हसन, मुस्तफिजुर रहमान आणि इबादत हुसेन.