
इंदोरमधील पहिल्या टेस्ट सामन्यात शानदार विजय मिळवल्यावर भारतीय संघ (Indian Team) आता बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर दुसरा टेस्ट सामना खेळण्यास सज्ज होत आहे. भारत (India) -बांग्लादेशमधील दुसरा टेस्ट डे-नाईट सामना असेल, शिवाय दोन्ही संघ पहिल्यांदा डे-नाईट टेस्ट खेळणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा असेल आणि त्यामुळे भारत-बांग्लादेश या मॅचला संस्मरणीय बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये शुक्रवारपासून सुरू होणार्या मालिकेच्या दुसर्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्याकडे भारतासाठी मोठा पराक्रम विश्वविक्रम नोंदवण्याची संधी आहे. भारतीय टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात आजवर कोणताही कर्णधार ही कामगिरी करून शकला नाही. यजमान टीम इंडियाने इंदोर टेस्ट सामन्यात बांग्लादेशविरुद्ध डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला. पण, कोहली या सामन्यात प्रभावी खेळी करू शकला नाही. त्यामुळे, दुसऱ्या सामन्यात विराट जास्त धावा करण्याचा प्रयत्न करेल. (नेटफ्लिक्स इंडियाने रविचंद्रन अश्विन याला दिला 'Man Of The Watch' पुरस्कार, टीम इंडियाच्या फिरकीपटूचे प्रतिसाद पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर)
इंदोर टेस्ट सामन्यात विराटने 2 चेंडूंचा सामान केला आणि शून्यावर बाद झाला. दरम्यान, दुसऱ्या टेस्टमध्ये 32 धावा करत भारतासाठी एका खास विक्रमाची नोंद करू शकतो. कर्णधार म्हणून 5000 धावा पूर्ण करण्यासाठी कोहलीला अवघ्या 32 धावांची गरज आहे. विराटने आजवर कर्णधार म्हणून टेस्टमध्ये 4968 धावा केल्या आहेत. हा भव्य पराक्रम करणारा पहिला भारतीय, तर विश्वातील सहावा फलंदाज बनेल. पाच हजार धावा करत विराट ग्रॅम स्मिथ, एलन बॉर्डर, रिकी पॉन्टिंग, क्लाइव लॉयड आणि स्टीव्ह फ्लेमिंग यासारख्या दिग्ग्जच्या क्लबमध्ये सामील होईल.
कोलकाताच्या या प्रतिष्ठित मैदानावर पिंक बॉलने खेळताना कोहली आणि अन्य भारतीय फलंदाजांना आपला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. दुसरा कसोटी सामना गुलाबी एसजी बॉलने खेळला जाईल. यापूर्वी दुलीप ट्रॉफीमध्ये कुकाबुर्रा गुलाबी चेंडू वापरले गेले होते.