India vs Bangladesh: भारत-बांग्लादेशमधील पहिल्या Day-Night Test मॅचसाठी चाहत्यांची उत्सुकता, ऑनलाइन झाली आजवर इतक्या तिकिटांची विक्री
ईडन गार्डन्स, टीम इंडिया (Wikimedia Commons Getty Images)

बांग्लादेश (Bangladesh) संघ सध्या भारत (India) दौऱ्यावर आहे. यादरम्यान, दोन्ही संघात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. बांग्लादेशने पहिल्या सामन्यात विजय मिळवला, तर आज दोन्ही संघात दुसरा सामना होणार आहे. त्यानंतर या संघांमध्ये पहिल्यांदा डे-नाईट टेस्ट सामना खेळवला जाईल. 22 नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जाईल आणि हा याची इतिहासात नोंद केली जाईल. भारत आणि बांगलादेशचा संघ प्रथमच डे-नाईट कसोटीत सामना खेळणार आहे. पण, त्यापूर्वी दोन्ही संघात 14 नोव्हेंबरपासून पहिला टेस्ट सामना इंदोरमध्ये खेळला जाईल. आणि, एमपीसीएच्या (MPCA) अहवालानुसार पहिल्या कसोटीच्या आधी मागील चार दिवसांत एकूण 40% तिकिटे विकली गेली आहेत. बुधवारी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे (एमपीसीए) अध्यक्ष अभिलाष खांडेकर (Abhilash Khandekar) म्हणाले की, 14 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी 7,000 तिकिट प्रेक्षकांनी आधीच खरेदी केले असून या सामन्याचे आता फक्त 9,000 पास बाकी आहेत. 27,000 लोकसंख्या असलेल्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांसाठी केवळ 16,000 तिकिटे आहेत आणि उर्वरित तिकिटे प्रायोजक, बीसीसीआयचे प्रतिनिधी, एमपीसीए सदस्य, माजी खेळाडू याच्यासाठी आरक्षित आहेत. (IND vs BAN Test 2019: भारत-बांग्लादेश संघातील पहिल्या डे-नाईट टेस्ट सामन्यासाठी तिकिटांचे दर आणि मॅचची वेळ, जाणून घ्या)

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिकेतील पहिला सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. अधिकृतपणे या मॅचचे तिकीट 10 नोव्हेंबरपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असतील आणि जर शिल्लक राहिल्या पुढे काही दिवसही विकले जातील. प्रेक्षकांनी निवडलेल्या गॅलरीनुसार सीझन पासची किंमत 315 ते 1,845 रुपये आहे. इतकेच नाही तर, भारतीय क्रिकेट संघाच्या पहिल्या डे-नाईट कसोटीला चाहत्यांचा उत्कंठा शिगेला पोहोचला असून तीन दिवसात विकल्या गेलेल्या ऑनलाईन तिकिटांची विक्री 2 दिवसात पूर्ण झाली आहे. कॅबचे (Cricket Association of Bengal) सचिव अविशेक डालमिया (Avishek Dalmiya) यांनी सांगितले की, "पहिल्या तीन दिवसांसाठी30% तिकिटे (5,905 तिकिटे) ऑनलाइन विकली गेली आहे. शिवाय, भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसासाठी 3,500 तिकिटं विकली गेली आहेत. 22 नोव्हेंबरपासून कोलकातामध्ये भारत-बांगलादेश यांच्यात डे-नाईट कसोटी सामना खेळला जाईल. सर्व सेलिब्रिटींसोबत, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यासुद्धा हा सामना पाहण्यासाठी हजार राहणार आहे.

विश्वचषक 2019 च्या समारोपानंतर टीम इंडियाची घरच्या मैदानावर खेळली जाणारी ही दुसरी मालिका आहे. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघाने 240 गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवले आहे.