
भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघातील मालिकेतिल दुसरा कसोटी सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये (Eden Gardens) खेळला जाईल. बांग्लादेश संघ बुधवारी भारतात पोहचणार आहे. भारत दौर्यावर बांग्लादेश संघ तीन टी-20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दोन्ही संघातील दुसरा टेस्ट सामना डे-नाईट सामना असेल. हा सामना भारत आणि बांग्लादेशसाठी पहिला डे-नाईट टेस्ट सामना असणार आहे. भारतात होणार्या पहिल्या डे-नाईट टेस्ट मॅचच्या घोषणेसह बंगाल क्रिकेट असोसिएशनने (Bengal Cricket Assosiation) तयारीही सुरू केली आहे. सामन्यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांना आकर्षित कारण्यासाठी तिकिटाचे किमान दर पन्नास रुपये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दररोज तिकिटे उपलब्ध असतील आणि कोणीही ते विकत घेऊ शकेल आणि सामना पाहू शकतो. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभिषेक डालमिया म्हणाले की, हा सामना नियोजित वेळेच्या एक तासापूर्वी सुरू होण्याची आम्ही अपेक्षा करू शकतो. म्हणजे, भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल आणि रात्री 8.30 वाजता संपेल, ज्यामुळे दर्शक लवकर घरी जाऊ शकतील. मात्र, बीसीसीआयकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून सामना सुरू होण्याची वेळ निश्चित केली जाईल. (ऑलिम्पिक पदकविजेतांचा सन्मान, शालेय मुलांना मोफत Pass; भारताची पहिली डे/नाईट टेस्ट अविस्मरणीय करण्यासाठी BCCI सज्ज)
अभिषेक डालमिया म्हणाले की, बीसीसीआयकडून वेळ निश्चित केल्यावर तिकिटे छपाईसाठी पाठविली जातील. कॅबने तिकिट दर दिवसाला 50 रुपये ठेवला आहे जेणेकरून मोठ्या संख्येने 68,000 च्या क्षमतेच्या ऐतिहासिक ईडन गार्डनमध्ये प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी येतील. शिवाय, सीएबी जिल्हास्तरीय शाळांमधील स्थानिक मुलांनाही सामना पाहण्यासाठी मोफत तिकिटं देणार आहे आणि सामन्यात कोणत्याही प्रकारची गैरसोय नको आहे. तिकिटे दररोज उपलब्ध असतील आणि किंमत 50, 100 आणि 150 रुपये असेल. पारंपारिक टेस्ट क्रिकेटनुसार, यात तीन सत्रांचा खेळ खेळला जाईल. पहिल्या सत्रा नंतर चहाचा वेळ असेल आणि त्यानंतर रात्रीचे जेवण होईल. दीड सत्राचा खेळ लाईटमध्ये खेळला जाईल. पहिला ब्रेक 20 मिनिटांचा होईल तर दुसरा ४० मिनिटांचा असेल.
भारत-बांग्लादेश संघाचा हा पहिला डे-नाईट टेस्ट सामना आहे. तर 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात अॅडलेड ओव्हलमध्ये पहिली डे-नाईट टेस्ट खेळली गेली होती. भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना 16 नोव्हेंबरपासून रोजी इंदोर (Indore) येथे होईल. तर दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून कोलकाता (Kolkata) येथे खेळला जाईल. ईडन गार्डन्सवर दरवर्षी डे-नाईट टेस्ट सामने खेळवले जाणार आहेत.