बांग्लादेश (Bangladesh) संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्यावर आयसीसीने दोन वर्षाची बंदी घातली आहे. शाकिबकडे एका बुकीने मॅच फ़िक्सिन्गसाठी संपर्क साधला होता, मात्र शाकिबने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) याची माहिती दिली नाही. यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. टीमसाठी ही वाईट बातमी संघाच्या भारत (India) दौर्याच्या अगदी आधी आली आहे. या दौर्यावर बांगलादेशला तीन टी -20 आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. पण, आता शाकिबवरील बंदीमुळे संघाचे नेतृत्व दोन अनुभवी खेळाडूंकडे सोपविण्यात आले आहे. बीसीबीने महमूदुल्लाह (Mahmudullah) याला टी-20 आणि मोमीनुल हक (Mominul Haque) याच्याकडे टेस्ट संघाची जबाबदारी दिली आहे. या एक महिन्यांच्या लांब दौर्यासाठी बांगलादेश क्रिकेट टीम बुधवारी भारतात पोहचेल. रविवारी 3 नोव्हेंबरला टीमला दिल्लीत पहिला टी-20 सामना खेळवण्यात येईल. (भारत दौऱ्यापूर्वी बांग्लादेशला मोठा धक्का; Shakib Al Hasan वर ICC ने घातली बंदी, जाणून घ्या काय आहे प्रकरण)
दुसरीकडे, शाकिबच्या जागी टी-20 संघात तैजुल इस्लाम याला स्थान देण्यात आले आहे. शिवाय, पाठीच्या दुखापतीमुळे दौर्याबाहेर पडलेल्या मोहम्मद सैफुद्दीन याची जागा अबू हैदर घेईल, तर तमिम इक्बाल यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. पूर्वी, तमिमच्या जागी इमरुल कायस याला संधी देण्यात आली होती, पण तमिम आपल्या दुसर्या मुलाच्या जन्मामुळे टी-20 मालिकेचा भाग नसला तरीही कसोटी संघात त्याचा समावेश केला गेला आहे. बांग्लादेशच्या टेस्ट संघात मुस्तफिजुर रहमान याचेही पुनरागमन झाले आहे. रहमानने मार्च 2019 मध्ये शेवटची कसोटी खेळली होती. त्याचबरोबर ऑक्टोबर 2014 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळणारा अल-अमीन-हुसेन याचाही चार वर्षांनंतर कसोटी संघात परतला आहे.
Bangladesh squad for the 2-match Test series against India#BCB #BANvIND pic.twitter.com/LrjT2Bycy5
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 29, 2019
वादाच्या दरम्यान बांग्लादेशी संघ महमूदुल्लाच्या नेतृत्वात टी-20 मालिकेत कशी कामगिरी करतो हे पाहणेही रोचक ठरेल. बर्याच दिवसांपासून चांगली कामगिरी न करणाऱ्या महमूदुल्लाचे संघातील स्थान धोक्यात आले होते, तर मोमीनुल हक संघासाठी नियमितपणे कसोटी क्रिकेट खेळत आहे. अशा परिस्थितीत संघाचे यशस्वीरित्या नेतृत्व करण्यात आणि बांग्लादेश क्रिकेटला वादांपासून दूर ठेवण्यासाठी या दोन्ही खेळाडूंची भूमिका महत्त्वपूर्ण असेल.
पहा बांग्लादेशचा टेस्ट संघ: शादमन इस्लाम, इम्रुल कायस, सैफ हसन, मोमीनुल हक (कॅप्टन), लिटन दास, मुश्फिकुर रहीम, महमूदुल्ला, मोहम्मद मिथुन,मोसद्देक हुसेन, मेहिदी हसन, तैजुल इस्लाम, नईम हसन, मुस्तफिजुर रहमान, अल-अमीन-हुसेन, अबू जयद, आणि एबादत हुसेन.