IND vs AUS 3rd Test: सिडनी टेस्ट मॅचसाठी असा असेल टीम इंडियाचा Playing XI, पहा कोणाला मिळेल संघात स्थान
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs AUS 3rd Test at Sydney: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) तिसऱ्या कसोटी सामन्यात टक्कर होणार आहे. अ‍ॅडिलेड मध्ये भारतीय संघाला (Indian Team) दुसऱ्या डावात 36 धावांवर गुंडाळत यजमान संघाने 8 विकेटने सामना जिंकला, मात्र नंतर मेलबर्नमधील दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक करत ऑस्ट्रेलियाला 8 गडी राखून पराभूत करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. दोन्ही संघातील लढत आणखी मनोरंजक होत आहे. आता मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात दोन्ही संघ सिडनी ग्राउंडवर उतरतील. 7 जानेवारीपासून न्यू इयर कसोटी सामन्याला सुरुवात होईल. मागील सामन्यातील दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल पाहायला मिळणार आहेत. भारतीय संघात दोन बदल होताना दिसत आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) परतला आहेत तर टीम इंडिया मधली फळी मजबूत करू इच्छित असेल. आपण आपण पाहणार आहोत कोण आहे ते 11 खेळाडू ज्यांना तिसर्‍या कसोटीत भारतीय संघात स्थान मिळू शकते. (IND vs AUS 2020-21: SCG मध्ये टीम इंडियाचा 'द वॉल' राहुल द्रविडने एक धाव घेताच प्रेक्षकांनी उभं राहून वाजवल्या होत्या टाळ्या, पहा Video)

मेलबर्नमधील आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शुभमन गिलने चांगले प्रभावित केले, त्यामुळे 21 वर्षीय फलंदाजाचे तिसऱ्या मॅचमध्ये खेळणे निश्चित आहे. शुभमनसह रोहित शर्मा आयपीएलनंतर मैदानावर परतणार असेल. शिवाय, मयंक अग्रवालच्या अपयशानंतर रोहितचा ओपनर म्हणून समावेश केला जाऊ शकतो. चेतेश्वर पुजारा तिसऱ्या स्थानावर फलंडनजी करेल,त आर कर्णधार अजिंक्य रहाणे, विकेटकीपर रिषभ पंत, हनुमा विहारी मधल्या फळीत फलंदाजी करतील. रवींद्र जडेजा संघाचा अष्टपैलू खेळाडू असेल. रविचंद्रन अश्विन पुन्हा एकदा कांगारू संघाला आपल्या फिरकीच्या जाळीत अडकवण्यासाठी सज्ज असेल. याशिवाय जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराजवर वेगवान गोलंदाजी विभागाची जबाबदारी असेल. दुसरीकडे, वनडे आणि टी-20 मध्ये पदार्पण करणाऱ्या टी नटराजन कसोटी पदार्पण करताना दिसेल.

पहा सिडनी टेस्टसाठी भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन

अजिंक्य रहाणे (कॅप्टन), शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि टी नटराजन.