'द वॉल' राहुल द्रविड (Photo Credit: Twitter)

IND vs AUS 2020-21: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) क्रिकेटच्या मैदानावर कठोर खेळीसाठी सामान्यत: 'वॉल' म्हणून ओळखला जातो, पण एके काळी फक्त एक रन काढल्याबद्दल स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी त्याच्यासाठी उभं राहुल टाळ्या वाजवल्या. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) 2008 मध्ये भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान ही घटना घडली होती. द्रविड 18 च्या स्कोअरवर फलंदाजी करीत होता आणि त्यानंतरच पुढची धावा घेण्यापूर्वी त्याने सलग 40 डॉट बॉल खेळले. अखेरीस एक धाव घेत जेव्हा द्रविड 19 धावांवर पोहचला तेव्हा SCG वर उपस्थित प्रेक्षक आपल्या खुर्चीवरून उभे राहिले व हसत टाळ्या वाजवल्या. शिवाय, द्रविडने देखील चाहत्यांना निराश केले नाही आणि अभावधन करत आपली बॅट उंचावली. (IND vs AUS 3rd Test: टीम इंडियाविरुद्ध तिसऱ्या टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका, ‘हा’ गोलंदाज सिडनी कसोटीतून आऊट)

cricket.com.au च्या अधिकृत हँडलने या घटनेचा थ्रोबॅक व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘‘स्टिव्ह स्मिथला सलग निर्धाव चेंडू खेळताना पाहून सिडनी क्रिकेट ग्राउंडवर एक अशीच घटना घडली होत, त्याची आठवण झाली. तेव्हा राहुल द्रविडला 40 चेंडू खेळताना धाव घेता आली नव्हती.’’ सिडनी ग्राउंडवर एक रन काढल्यावर वातावरण असं तयार झालं होतं की जणू द्रविडने शतकच ठोकलं आहे. काही चाहते आपल्या जागेवरून उठून द्रविडचं अभिनंदन करत होते, पण द्रविडने परिस्थीती समजून ही घटना गंमतीने घेतली. राहुलचा हा अंदाज पाहून प्रेक्षक आणखी जोरात टाळ्या वाजवू लागले होते. पहा व्हिडिओ:

द्रविड वगळता मागील वर्षी न्यूझीलंडविरुद्ध सिडनी ग्राउंडवर माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथने देखील त्याचप्रमाणे फलंदाजी करत भारतीय फलंदाजाच्या बॅटिंगची आठवण करून दिली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्मिथनेत्याने एवढी संथ गतीने फलंदाजी ऐकली की त्याला तब्बल 39 चेंडू खेळल्यानंतर पहिली धाव घेतली. त्यामुळे पहिली धाव काढल्याने स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभे राहुन टाळ्या वाजवल्या आणि स्मिथने देखील आणि हसत आपला हात उंचावत त्यांचा प्रोत्साहन स्विकारला.