क्रिकेटमध्ये पुरुषांच्या टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत पंच म्हणून आपण पुरुषांनाच पाहात आलो. आता हा इतिहास क्लेयर पोलोसाक (Claire Polosak ) यांच्या मुळे बदलला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया ( India and Australia) यांच्यात सिडनी (Sydney) येथे खेळल्या जाणाऱ्या पुरुषांच्या टेस्ट सामन्यात क्लेयर पोलोसाक पंच म्हणून कामगिरी बजावणार आहेत. त्यामुळे टेस्ट सामन्यांमध्ये अंपायर म्हणन काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील. सिडनी येथील क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) पहिल्यांदाच इतिहस बदलताना पहायला मिळणार आहे.
ऑस्ट्रेलिया येथील न्यू साऊथ वेल्स येथील रहिवासीअसलेल्या 32 वर्षीय पोलोसाक या सामन्यात चौथ्या पंचाची जबाबदरी पार पाडतील. दरम्यान, या आधी त्यांनी पुरुषांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अंपायरींग केले आहे. 2019 मध्ये त्यांनी नामीबिया आणि ओमान यांच्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट लीग डिव्हीजनमध्ये दोन सामन्यांसाठी पंचगिरी केली आहे.
भारत आणि ऑस्ट्रलिया याच्यात चार सामन्यांच्या मालिकेतील तसऱ्या सामन्यामध्ये दोन माजी वेगवान गोलंदाजांनी पंच म्हणून भूमिका पार पाडतील. पॉल रिफेल आणि पॉल विल्सन अशी या दोघांची नावे आहेत. दोघे मैदानावर पंच म्हणून जबाबदारी पार पाडतील. तर, ब्रूस ऑक्सेनफोर्ड हे तिसरे पंच म्हणून जबाबदारी पार पाडतील. डेव्हिड बून हे मॅच रेफरी असतील. (हेही वाचा, AUS Vs IND 3rd Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी रिषभ पंत जिममध्ये घेतोय 'अशी' मेहनत; पाहा व्हिडिओ)
पोलोसाक यांच्यासोबत ऑस्ट्रेलियामध्ये 2017 मध्ये पुरुषांच्या सामन्यांत पंच म्हणून काम पाहणाऱ्या स्थानिक यादित ए मॅच यांचे नाव आहे. चौथा अंपायरचे काम मैदानात नवे चेंडू आणणे. पंचांसाठी ड्रिंक पाठवणे, भोजन, चाहा यांदरम्यान मैदानाची जबाबरी, पाहणी आणि लाईटमीटरच्या माध्यमातून प्रकाशयोजना पाहणे अशा प्रकारची जबाबदारी असते.
अपात्कालीन काळात किंवा काही कारणाने मैदानातील दोन्ही पैकी एका पंचाला मैदानाबाहेर जावे लागले तर त्या ठिकाणी जबाबदारी पार पाडण्याचे काम चौथ्या पंचाचे असते.