ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात (AUS Vs IND) यांच्यातील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी रोजी सिडनी मैदानावर खेळला जाणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघाने एक-एक विजय मिळवला आहे. तर, पुढील सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. यामुळे दोन्ही संघातील खेळाडू तयारीत आहे. यातच भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रिषभ जिममध्ये असून तो सलग एकामागे एक फ्रंट हँडस्प्रिंग्ज करताना दिसत आहे. रिषभ हा वजन कमी करण्यासाठी फ्रंट हँडस्प्रिंग्ज करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात रिषभ पंतला संधी देण्यात आली होती. मात्र, रिषभ पंतने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 40 बॉल खेळून 29 धावा केल्या होत्या. तर, दुसऱ्या डावात त्याची फलंदाजी येण्याआधीच भारताने हा सामना 8 विकेट्सने जिंकला आहे. हे देखील वाचा- IND vs AUS 3rd Test: एमएस धोनीची बरोबरी करण्यापासून अजिंक्य रहाणे एक पाऊल दूर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यात विक्रमाची संधी
ट्विट-
Good day at the lab. 🔬 pic.twitter.com/EkgtYrjhri
— Rishabh Pant (@RishabhPant17) January 5, 2021
7 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रिषभच्या बॅटमधून अधिक रन पाहायला मिळतील, अशी अनेकांची अपेक्षा आहे. तसेच भारतीय संघ पहिल्या अकरामध्ये बदल होणार आहेत. सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीनंतर पुनरागमन करण्यास निश्चित आहे, तर उमेश यादवच्या दुखापतीमुळे शार्दुल ठाकूर, टी नटराजन आणि नवदीप सैनी यांपैकी कोणाला संघात जागा मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.