IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) तिसर्या कसोटी सामन्याच्या तयारीसाठी टीम इंडिया (Team India) नेटमध्ये कसून सराव करत आहेत. गुरुवार, 7 जानेवारी रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर हा सामना सुरू होईल आणि सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा भारतीय संघाला बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासाठी मार्गदर्शन करणाऱ्या प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) असेल. रहाणेने विराट कोहलीच्या अनुपस्थितीत पदभार स्वीकारला आणि अॅडलेडच्या पराभवातून बाहेर पडत मेलबर्न येथील दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यात नशिब फिरवत विजयी संघाचे नेतृत्व केले. त्याने झुंजार शतकी खेळी करत संघाला मालिकेत 1-1 अशी बरोबरी करून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. सिडनीमधील तिसऱ्या टेस्ट सामन्यात संघाने विजय मिळवल्यास अजिंक्य रहाणे माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) विक्रमाची बरोबरी करेल. (AUS vs IND 3rd Test Playing XI: ऑस्ट्रेलियाचे 'हे' 11 खेळाडू देऊ शकतात टीम इंडियाला टक्कर, ताफ्यात सामील होतील दोन घातक फलंदाज)
धोनीने 2008 मध्ये अनिल कुंबळेनंतर कर्णधारपद स्वीकारल्यावर संघाला पहिल्या चारही सामन्यात विजय मिळवून दिला होता आणि आता सिडनीमध्ये टीम इंडियाने विजय मिळवल्यास रहाणेचे नाव देखील कर्णधार म्हणून पहिले चार कसोटी सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या एलिट यादीत सामील होईल. टेस्टमध्ये भारताचा कर्णधार म्हणून रहाणेकडे शंभर टक्के ट्रॅक रेकॉर्ड आहे. रहाणेच्या नेतृत्वात संघाने 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया, 2018 अफगाणिस्तान आणि 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध - असे तीन सामने जिंकले आहेत. मुंबईकर फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 1000 कसोटी धावा पूर्ण करण्यापासून काही पावलं दूर आहे. रहाणेने ऑस्ट्रेलियामध्ये 797 धावा केल्या असून कांगारू देशात हजारी गाठण्यासाठी त्याला 203 धावांची गरज आहे आणि तिसर्या कसोटी सामन्यात त्याने असे केल्यास तो यादीत सामील होणार पाचवा भारतीय ठरेल.
परदेशी सामन्यांमध्ये रहाणेने 2891 धावा केल्या आहेत. म्हणजे त्याला 3000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त 109 धावांनी पिछाडीवर आहे. आतापर्यंत 9 टीम इंडिया खेळाडूंनी भारताबाहेर 3,000 हुन अधिक कसोटी धावा केल्या आहेत. या यादीत महान फलंदाज सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. मास्टर ब्लास्टरने 106 सामन्यात 8705 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, टीम इंडियाला एससीजीतील 42 वर्षांचा मसुदा संपविण्याचीही संधी आहे. SCG मध्ये खेळलेल्या 12 सामन्यांत भारताला फक्त एक विजय मिळविण्यात यश आले आहेत. टीम इंडियाने अखेर 1978 मध्ये सिडनीमध्ये विजय मिळवला होता.