AUS vs IND 3rd Test Playing XI: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) सिडनी (Sydney) येथे होणाऱ्या तिसर्या कसोटी सामन्यात आमने-सामने येतील. बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar Trophy) मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत असल्याने दोन्ही संघ आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असतील. मेलबर्नमधील जबरदस्त कामगिरीनंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. शिवाय, रोहित शर्मा सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असल्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल अपेक्षित आहेत. दुसरीकडे, यजमान ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच मैदान मारण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील आणि दुसऱ्या टेस्ट मॅचमधील पराभवानंतर त्यांना देखील फलंदाजीत सुधार करण्याची गरज आहे. ज्यामुळे, त्यांच्याही प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल अपेक्षित आहे. ग्रोईन दुखापतीमुळे पहिल्या दोन टेस्ट सामन्यांना मुकलेला डेविड वॉर्नर (David Warner) संघात कमबॅक करेल, तर युवा फलंदाज विलो पुकोव्हस्कीला (Will Pucovski) पदार्पणाची संधी दिली जाईल. (IND vs AUS 3rd Test: सिडनी टेस्ट मॅचसाठी असा असेल टीम इंडियाचा Playing XI, पहा कोणाला मिळेल संघात स्थान)
जो बर्न्सला तिसऱ्या टेस्ट सामन्यासाठी कांगारू संघातून बाहेर केल्यामुळे वॉर्नर आणि पुकोव्हस्की सलामीला मैदानात उतरतील. मार्नस लाबूशेन चांगल्या सुरुवातीनंतर मागील दोन्ही सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे, ज्यामुळे त्याचे लक्ष आपला खेळ सुधरवण्याकडे असेल. शिवाय, दोन्ही सामन्यात फ्लॉप असूनही स्टिव्ह स्मिथ चौथ्या स्थानी कायम असेल. स्मिथ आपल्या अपयशी मालिका खंडित करण्याच्या प्रयत्नात असेल. ट्रेव्हिस हेडच्या जागी मॅथ्यू वेडला मधल्या फळीत उतरवले जाऊ शकते. तर कर्णधार टिम पेन आणि कॅमरुन ग्रीनवर मधल्या फळीची जबाबदारी असेल. गोलंदाजी विभागात कोणताही बदल होण्याची शक्यता दिसत नाही.
असा असेल ऑस्ट्रेलिया सिडनी टेस्टसाठी संभावित प्लेइंग इलेव्हन: टिम पेन (कॅप्टन), डेविड वॉर्नर, विल पुकोव्हस्की, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड आणि नॅथन लायन.