टिम पेन आणि अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

IND vs AUS 2nd Test Stats: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) दुसऱ्या सामन्यात शानदार खेळ दाखवत भारतीय संघाने (Indian Team) बॉक्सिंग डे कसोटीत (Boxing Day Test) ऑस्ट्रेलियाला 8 विकेटने पराभूत केले. मंगळवारी संघाने दोन विकेट गमावून ऑस्ट्रेलियाने दिलेले 70 धावांचे लक्ष्य गाठले. यासह भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात कर्णधार रहाणेसह रवींद्र जडेजा, पदार्पणवीर शुभमन गिल, गोलंदाजी विभागात अश्विन, जसप्रीत बुमराह आणि नवोदित मोहम्मद सिराज यांनी मोठी भूमिका बजावली. टीम इंडियाने पहिल्या दिवसापासून सामन्यावरील पकड मजबूत करून ठेवली. ऑस्ट्रेलिया एकही डावात दोनशे पार धावसंख्या गाठू शकला नाही. इतकंच नाही तर एकही कांगारू फलंदाज मोठा डाव खेळू शकला नसल्याने गोलंदाजही धावसंख्येचा बचाव करण्यात अपयशी ठरले. (IND vs AUS 2nd Test 2020: मेलबर्नमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ; विराट कोहली, वसीम जाफरसह सोशल मीडियावर आल्या अशा प्रतिक्रिया)

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारताचा हा ऐतिहासिक विजय ठरला. भारतीय खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाने देखील काही महत्वपूर्ण आकड्यांची नोंद केली. जाणून घ्या:

1. मेलबर्नमधूला भारताचा हा चौथा विजय असला तरी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये आठव्या वेळी कसोटी सामना जिंकला आहे. विशेष म्हणजे मेलबर्नमधील ऐतिहासिक मैदानावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये पहिला कसोटी विजय मिळविला होता. ऑस्ट्रेलियामध्ये 1977 मध्ये बिशन सिंह बेदी यांच्या नेतृत्वात संघाने पहिल्यांदा 222 धावांनी विजय मिळविला होता.

2. मेलबर्नमधील विजयने अजिंक्य रहाणे आता ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताला विजय मिळवून देना सहावा कर्णधार ठरला आहे. ऑस्ट्रेलियामधील 50 सामन्यांपैकी हा भारताचा 8वा कसोटी विजय आहे.

3. 2020 मध्ये सलग तीन पराभवानंतर भारताचा पहिला विजय ठरला. अ‍ॅडिलेडमधील पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यावर दोन सामन्यांच्या मालिकेत पराभव पत्करावा लागला होता.

4. 1982 आणि 1986 मध्ये इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एमसीजी येथे सलग बॉक्सिंग डे कसोटी जिंकणारा भारत दुसरा संघ ठरला. शिवाय, टॉस गमावल्यानंतर एमसीजी येथे कसोटी जिंकणारा 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेनंतर भारत दुसरा पाहुणा संघ बनला.

5. प्रसिद्ध एमसीजी आता घरापासून दूर भारताचे धावांचा पाठलाग करतानाचे आवडते मैदान बनले आहे. मेलबर्नमध्ये 14 कसोटी सामन्यांमध्ये भारताने 1977, 1981, 2018 आणि 2020 असे चार सामने जिंकले आहेत. त्यांनी पोर्ट ऑफ स्पेन, किन्स्टन आणि कोलंबो येथे प्रत्येकी तीन जिंकले आहेत.

6. मेलबर्नच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलं. यासह 32 वर्षानंतर मेलबर्न टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एकही बॅट्समनला अर्धशतक करता आलं नाही. पहिल्या डावात मार्नस लाबूशेनने सर्वाधिक 48, तर दुसऱ्या डावात कॅमरून ग्रीनने 45 धावांची खेळी केली. यापूर्वी मायदेशात 1988 साली ऑस्ट्रेलियन फलंदाजांना संपूर्ण सामन्यात एकही अर्धशतक करता आलं नव्हतं.

7. दुसऱ्या डावात अश्विनने जॉस हेजलवूडची विकेट घेताच नवीन विश्वविक्रम स्वत:च्या नावावर केला. फिरकीपटूने 192 व्यांदा डावखुऱ्या फलंदाजाला टेस्टमध्ये माघारी धाडण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी हा विश्वविक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर हा विक्रम होता. मुरलीधरनच्या 800 विकेटपैकी 191 विकेट या डावखुऱ्या फलंदाजांच्या होत्या.

8. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने तीन कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले आणि सर्वांमध्ये विजय नोंदवला. यापूर्वी रहाणेने अफगाणिस्तानविरुद्द एकमेव कसोटीत तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगलोर सामन्यात कर्णधारपद सांभाळले होते.

9. 1976 मध्ये ऑकलंडमध्ये सुनील गावस्कर यांच्यानंतर परदेशी मैदानावर कर्णधार म्हणून कसोटी सामन्यात रहाणे ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक ठोकणारा पहिला आणि कर्णधारपदी असता संघाच्या विजयात शतकी खेळी करणारा दुसरा कर्णधार ठरला.

10. 2003 अ‍ॅडिलेड कसोटी सामन्यात राहुल द्रविडनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील भारतासाठी विजयी धावा ठोकणाराअजिंक्य रहाणे दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.